पाकिस्तानातील गोंधळ वाढला, इमरान खान यांच्या विरोधात विरोधी पक्षांचे नेते सामूहिक राजीनामे देणार

इमरान खान सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांचे संसद सदस्य  सामूहिक राजीनामे देण्याची शक्यता आहे.(Pakistan Imran Khan)

पाकिस्तानातील गोंधळ वाढला, इमरान खान यांच्या विरोधात विरोधी पक्षांचे नेते सामूहिक राजीनामे देणार
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 10:52 AM

नवी दिल्ली: आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानातील इमरान खान सरकार पुढील संकट दिवसेंदिवस वाढत आहेत. पाकिस्तानातील अर्थव्यवस्थेचा कणा कोरोना संकटामुळे मोडला आहे. इमरान खान यांच्यासमोरील संकटं वाढतच आहेत. इमरान खान सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांचे संसद सदस्य  सामूहिक राजीनामे देण्याची शक्यता आहे. भारताचा दुसरा शेजारी देश चीन अमेरिकेतली सत्ता परिवर्तनानंतर अमेरिकेसोबत मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. तर, नेपाळमध्ये हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी होत आहे. (Group of opposition leaders may resigns in Pakistan against Imran khan)

पाकिस्तान (Pakistan)

पंतप्रधान इमरान खान यांच्या नेतृत्त्वातील सरकारपुढे कोरोनामुळे मोठं आव्हान निर्माण केलं आहे. इमरान खान यांच्या विरोधात विरोधी पक्षांचे नेते सातत्यानं हल्लाबोल करत आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांना जनतेचेही समर्थन मिळत आहे. पाकिस्तानातील विरोधी पक्षाचे संसद सदस्य सामूहिक राजीनामा देण्याची शक्यता आहे.

चीन (China)

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जो बायडन यांची सत्ता येणार आहे. चीन अमेरिकेसोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, सध्या अमेरिकेतील प्रशासन डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेच आहे. त्यामुळे चीनच्या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. हाँगकाँगच्या स्वायत्ततेवर कमजोर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 14 चिनी अधिकाऱ्यांवर अमेरिकेने प्रतिबंध लावले होते. या अधिकाऱ्यांमध्ये एका तिबेटी अधिकाऱ्याचा समावेश आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी चीनमधील एनपीसीएससीने हाँगकाँगच्या निवडणुकीसंदर्भातील क्षमतेवर प्रभाव टाकल्याचे सांगितले. त्यामुळे 14 चिनी अधिकाऱ्यांवर बंदी घालण्यात आली.

नेपाळ (Nepal)

भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध सातत्यानं चांगले राहिले आहेत. नेपाळमध्ये आलेल्या अनेक नैसर्गिक आपत्तींमध्ये भारतानं नेपाळची मदत केली आहे. मात्र, नेपाळ आणि भारतामध्ये 2020 मध्ये सीमावाद निर्माण झाल्यानं दोन्ही देशांतील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांतील बिघडलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची बैठक सोमवारी झाली. भारत आणि नेपाळच्या अधिकाऱ्यांनी द्विपक्षीय आर्थिक संबंधांवर चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये व्यापार इतर विषयांवर चर्चा झाली.

नेपाळमध्ये हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी

भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये आणखी एक वादळ उठलं आहे. नेपाळला पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी काही संघटनांनी आंदोलन सुरु केलं आहे. आंदोलक मोठ्या प्रमाणात रस्त्यांतवर उतरले असून पंतप्रधान के.पी.ओली शर्मा यांच्या विरोधात नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. आंदोलकांनी नेपाळमधील सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांवर रोष व्यक्त केला आहे. हिंदू राष्ट्र घोषित करुन नेपाळमध्ये राजेशाही लागू करावी, अशी मागणी देखील आंदोलकांनी केली आहे.

संबंधित बातम्या: 

Happy Birthday Udit Narayan | नेपाळी चित्रपटसृष्टीपासून करिअरची सुरुवात, एका गाण्यामुळे उदित नारायणांचे नशीब चमकले!

‘रॉ’चे प्रमुख नेपाळमध्ये; देशातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी आणि पंतप्रधानांशी दोन तास गुप्त चर्चा

नेपाळ वठणीवर, संरक्षण मंत्र्यांना हटवलं, लष्करप्रमुख नरवणेंच्या दौऱ्यापूर्वी हालचाली

(Group of opposition leaders may resigns in Pakistan against Imran khan)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.