झूम मिटिंग करताना सावध राहा, एका मिटिंगमध्ये जे घडलं ते तुमच्यासोबत ही होऊ शकतं; त्यालाही घाबरून…
अमेरिकेतील एका कंपनीच्या झूम मिटिंगमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. या मिटिंगमध्ये अश्लील व्हिडीओ सुरू झाल्याने मिटिंगमधील सदस्यांनी धडाधड मिटिंग सोडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
वॉशिंग्टन : रेल्वे स्थानकावर अचानक अश्लील व्हिडीओ सुरू झाल्याची बातमी येऊन धडकली होती. विधानसभेत एका आमदाराने अश्लील व्हिडीओ पाहिल्याच्या बातमीनेही खळबळ उडाली होती. अशा घटना वारंवार घडताना दिसत आहेत. आता आणखी एक अशीच घटना उघड झाली आहे. त्यामुळे सर्वांवरच मान खाली घालण्याची वेळ आली आहे. झूमवर अत्यंत महत्त्वाची मिटिंग सुरू असतानाच अचानक अश्लील व्हिडीओ सुरू झाला. त्यामुळे मिटिंगमधील काही लोकांना मिटिंग सोडून जावं लागलं.
ही घटना अमेरिकेतील आहे. कोनी आयलँड हेल्थ सेंटरमध्ये एक झूम मिटिंग होती. सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसिजच्या वाढत्या घटनांवर या बैठकीत चर्चा सुरू होती. त्यावेळी अचानक स्क्रिनर अश्लील वर्तन करताना एक व्यक्ती दिसला. तो विचित्र आवाजही काढत होता. मिटिंग सुरू असताना लोक हे पाहात होते. अचानक सुरू झालेल्या या प्रकाराने सर्वच घाबरले. कुठे पाहावे हेच त्यांना कळेनासे झाले. हा प्री रेकॉर्डेड असल्याचं दिसून येत होतं. त्यामुळे या मिटिंगचे होस्ट लुसी डियाज हे भडकले. हे काय आहे? असा सवाल त्यांनी केला आणि मिटिंगमधील प्रत्येक व्यक्तिला मिटिंग सोडून जाण्यास सांगितलं.
माफी मागितली
हा पोर्न हॅक होता. मिटिंगला हॅक करण्यात आलं होतं. ही मिटिंग लगेच बंद करून दुसऱ्या मिटिंगची लिंक देण्यात आली. होस्टनेही या प्रकरणावर माफी मागून मिटिंग हॅक झाल्याचं सांगितलं. आम्ही सर्वांची माफी मागतो. आपली मिटिंग हॅक झाली होती, असं लुसी म्हणाले. लूसी कम्युनिटी बोर्ड 13चे महत्त्वाचे शिलेदार आहेत.
यापूर्वीही मिटिंग हॅक
ऑनलाईन मिटिंग हॅक होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही सरकारी बैठका हॅक करण्यात आल्या होत्या. कोविडच्या काळात हा प्रकार घडला होता. दोन वर्षापूर्वी न्यूयॉर्क कॉन्सिल इव्हेंटमध्ये 20 मिनिटासाठी मिटिंग हॅक झाली होती. यावेळीही स्क्रिनवर अश्लील व्हिडीओ सुरू झाला होता.
रेल्वे स्थानकात पोर्न
काही दिवसांपूर्वी भारतातील पटना रेल्वे स्थानकावरही असाच प्रकार घडला होता. पटना रेल्वे स्थानकात जाहिरातीसाठी लावण्यात आलेल्या टीव्हीवर पोर्न व्हिडीओ सुरू झाला होता. काही मिनिटं हा व्हिडीओ सुरू होता. त्यामुळे प्रवाशांची एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाची रेल्वेने गंभीर दखल घेतली होती. या प्रकरणी काही जणांना निलंबित करण्यात आलं होतं.