‘युद्ध थांबवा, सर्व बंधकांची सुटका करण्यास तयार…’ इस्रायलच्या हल्ल्यानंतर हमास आत्मसमर्पणाच्या पवित्र्यात?
इस्रायल आणि हमास युद्धासंदर्भात ही सर्वात मोठी बातमी आहे. ‘आम्हाला गाझामधील युद्ध संपवायचे आहे आणि सर्व बंधकांची सुटका करायची आहे,’ असे हमासने म्हटले आहे. इस्रायलच्या तुरुंगात असलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांच्या बदल्यात बंधक बनवलेल्या सर्व इस्रायली नागरिकांची आम्हाला सुटका करायची आहे, असे हमासच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

लवकरच इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध संपणार, असं दिसत आहे. हमासचे नेते खलील अल-हया म्हणाले की, आम्हाला यापुढे अंतरिम करार करायचा नाही. आता यावर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची गरज आहे. आम्हाला हे युद्ध तात्काळ संपवायचे आहे. आम्हाला गाझामध्ये युद्ध नको आहे.
7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर हल्ला करून 1,200 इस्रायली नागरिकांना ठार केले आणि अनेकांचे अपहरण केले. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात नागरिकांचा बळी गेला असून, त्यात बहुतांश महिला आणि मुले आहेत. दरम्यान, यावर आता हमासचे नेते खलील अल-हया यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. कारण, या वक्तव्यामुळे युद्ध संपण्याची आशा आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यात दीर्घकाळ सुरू असलेले युद्ध संपुष्टात येताना दिसत आहे. इस्रायलसमोर हमास शरणागतीच्या पवित्र्यात असल्याचे दिसत आहे. हे युद्ध आता संपले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.




आम्हाला गाझामधील युद्ध संपवायचे आहे आणि सर्व बंधकांची सुटका करायची आहे, असे हमासने म्हटले आहे. इस्रायलच्या तुरुंगात असलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांच्या बदल्यात बंधक बनवलेल्या सर्व इस्रायली नागरिकांची आम्हाला सुटका करायची आहे, असे हमासच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
हमासचे नेते खलील अल-हया म्हणाले की, आम्हाला यापुढे अंतरिम करार करायचा नाही. आता यावर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची गरज आहे. आम्हाला हे युद्ध तात्काळ संपवायचे आहे. आम्हाला गाझामध्ये युद्ध नको आहे.
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू आणि त्यांचे सरकार आपल्या राजकीय अजेंडय़ासाठी अंशत: तडजोड करत आहेत, ज्यामुळे गाझामध्ये उपासमार वाढत आहे. आम्ही सर्व बंधकांची सुटका करण्यास तयार आहोत.
7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर हल्ला करून 1,200 इस्रायली नागरिकांना ठार केले आणि अनेकांचे अपहरण केले. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात नागरिकांचा बळी गेला असून, त्यात बहुतांश महिला आणि मुले आहेत. गाझा उद्ध्वस्त झाला आहे. लोक युद्धाला कंटाळले आहेत आणि शांततेत जगू इच्छितात.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी वारंवार म्हटले आहे की, “हमासचा नायनाट करणे आणि प्रशासकीय युनिट म्हणून संघटनेचा नाश करणे” हे या युद्धाचे उद्दीष्ट आहे. युद्ध संपवण्यात आणि गाझामधून आपले सैन्य मागे घेण्यात आणि वाटाघाटी सुरू करण्यात अपयशी ठरल्यामुळे इस्रायलने जानेवारीतील शस्त्रसंधी कराराच्या अटी मोडल्याचा आरोप हमासने केला होता.