israel hamas war | हे ड्रग्ज पिऊन हमासने केली इस्रायलमध्ये कत्तल ? अहवालात धक्कादायक सत्य उघड
इस्रायलवर सात ऑक्टोबर रोजी हमास अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात एक विशिष्ट प्रकारच्या गोळ्या अतिरेक्यांनी खाल्ल्या होत्या असे आता उघडकीस आले आहे. या गोळ्यांना 'गरीबांचे कोकेन' म्हणतात.
नवी दिल्ली | 20 ऑक्टोबर 2023 : इस्रायलवर हमासने सात ऑक्टोबर रोजी जोरदार हल्ला केल्याने इस्रायलची कडेकोट सुरक्षा यंत्रणा फोल ठरली. या भयंकर हल्ल्यात 1400 हून अधिक इस्रायली ठार झाले. या हल्ल्यात दक्षिण इस्रायलमधील सुपर नोवा या म्युझिक फेस्टीव्हलमध्ये एकाच ठिकाणी 500 इस्रायली आणि परदेशी व्यक्तींना ठार करण्यात आले होते. आता या हल्ल्यात एक आश्चर्यकारक गोष्ट उघडकीस आली आहे. हल्ला करताना हमासच्या अतिरेक्यांनी ड्रग्जचा हेव्ही डोस घेतला होता अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
द जेरुसलेम पोस्टच्या माहीतीनूसार हमासच्या अतिरेक्यांनी सात ऑक्टोबरच्या हल्ल्यावेळी कॅप्टागन ( captagon ) नावाच्या गोळ्या खाऊन हल्ला केला होता. कॅप्टागन एक प्रकारचे सिंथेटिक ड्रग आहे. या हल्ल्यात हमासच्या ठार झालेल्या अतिरेक्यांच्या खिशात कॅप्टागन या गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. या टॅबलेटला ‘गरीबांचे कोकेन’ देखील म्हटले जाते. या गोळ्यांमुळे उत्तेजणा निर्माण झाल्याने त्यांना अनेक तास उपाशी रहाता येते. तसेच मेंदू देखील सर्तक रहातो असे म्हटले जाते.
इस्लामिक स्टेटचे अतिरेकी घ्यायचे ड्रग्ज
कॅप्टागनच्या गोळ्या साल 2015 मध्ये प्रथम उजेडात आल्या होत्यात. इस्लामिक स्टेट ( आयएस ) चे अतिरेकी देखील कोणत्याही मोठ्या हल्ल्यावेळी या गोळ्या खाऊनच हल्ला करायचे. आपण भीती चेपण्यासाठी या गोळ्या अतिरेकी खायचे. नंतर आयएसची भीती कमी झाली तशी सिरीया आणि लेबनॉन यांनी या गोळ्यांचे उत्पादन आणि वितरण वाढविले. गाझा या गोळ्यांची सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचे म्हटले जाते. विशेष करुन तरुण वर्गात या गोळ्यांना खूप मागणी आहे.
मध्य पूर्वेत लोकप्रिय
कॅप्टागन Amphetamine औषधांशी संबंधित आहे. या गोळ्या अटेंशन डिसऑर्डर, नार्कोलेप्सी आणि डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी याचे उत्पादन सुरुवातीला सुरु करण्यात आले होते. या गोळ्या हायली अडेक्टीव आणि सायकोटिक रिएक्शन असूनही मध्य-पूर्वेत खूपच लोकप्रिय आहेत. कारण त्या खूपच स्वस्त आहेत. यांना गरीबात गरीब देशातही दोन डॉलरला विकत घेता येते.तर श्रीमंत देशात हे औषध 20 डॉलर प्रति टॅबलेट मिळते. या गोळ्यांनी भूक लागत नाही, झोप देखील येत नाही आणि एनर्जी कायम रहाते.