Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hassan Nasrallah : हसन नसरल्लाहच्या बाबतीत इराणनेच गद्दारी केली का? एकदा हे वाचा

Hassan Nasrallah : नसरल्लाह बेरुत येथील हिज्बुल्लाहच्या सेंट्रल हेडक्वार्टरमध्ये संध्याकाळी 6 वाजता पोहोचला. संध्याकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी इस्रायलने स्ट्राइक केला. म्हणजे नरसल्लाह पोहोचल्यानंतर 5 मिनिटात इस्रायलने स्ट्राइक केला.

Hassan Nasrallah : हसन नसरल्लाहच्या बाबतीत इराणनेच गद्दारी केली का? एकदा हे वाचा
Israel Action Against Hassan Nasrallah
Follow us
| Updated on: Sep 29, 2024 | 5:30 PM

हिज्बुल्लाहच्या टॉप कमांडर्सना सुद्धा सुद्धा हसन नसरल्लाहजवळ सहज जाता येत नव्हतं. इराणी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी व किंवा खूप जवळचे लोक नसरल्लाह सोबत बोलायचे. नसरल्लाह कुठे आहे? काय करतोय? याची माहिती सुद्धा फार कमी लोकांकडे असायची. जगातील शक्तीशाली गुप्तचर यंत्रणा मोसादचे एजंट्स अनेक महिन्यांपासून नसरल्लाहचा शोध घेत होते. पण अचूक माहिती काही दिवसांपूर्वी मिळाली. नसरल्लाह सोबत काही जणांनी गद्दारी केली हे स्पष्ट होतं. अखेर तो गद्दार कोण होता? इराणचा दौरा करणं नसरल्लाहची सर्वात मोठी चूक ठरली का?

हिज्बुल्लाहच्या ज्या मीटिंगसाठी नसरल्लाह बेरुतच्या बंकरमध्ये आला होता. त्याचं सुद्धा इराणशी कनेक्शन आहे. इराणमध्ये झालेल्या बैठकीच ब्रीफिंग या मीटिंगमध्ये होणार होतं. एका इराणी अधिकारी सुद्धा नसरल्लाह सोबत होता, अशी बातमी आहे. त्यामुळे इस्रायलला इराण मार्गे नसरल्लाहच्या लोकेशनची माहिती मिळाली होती का? असा प्रश्न विचारला जातोय.

ही माहिती फुटली कुठून?

नसरल्लाह बेरुत येथील हिज्बुल्लाहच्या सेंट्रल हेडक्वार्टरमध्ये संध्याकाळी 6 वाजता पोहोचला. संध्याकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी इस्रायलने स्ट्राइक केला. म्हणजे नरसल्लाह पोहोचल्यानंतर 5 मिनिटात इस्रायलने स्ट्राइक केला. माहिती अचूक होती. मग, ही माहिती फुटली कुठून? हा प्रश्न निर्माण होतोय.

सगळ्याच घटनांच इराण कनेक्शन

नसरल्लाह आणि त्याच्यासोबत मारला गेलेला मोठा कमांडर दोन दिवसांपूर्वी इराणच गुप्त दौरा करुन परतला होता.

इराण सरकारमध्ये इस्रायलने घुसखोरी केलीय का? हानिया सुद्धा इराणमध्येच मारला गेला.

हमासचा कमांडर दाएफ ज्या दिवशी मारला गेला, त्याच्या दोन दिवस आधी तो IRGC च्या सीनियर कमांडरला भेटून आला होता.

हिज्बुल्लाहचा कमांडर फवाद शुक्र मारला जाण्याआधी त्याने इराणकडून आलेला शस्त्रसाठा ताब्यात घेतलेला.

टॉप कमांडर मोहम्मद सरूर 26 सप्टेंबरला मारला गेला. 24 सप्टेंबरला तो. इरानी प्रॉक्सीला सीरियामध्ये ट्रेनिंग देऊन परतला होता.

ऑपरेशन ‘न्यू ऑर्डर’

हिज्बुल्लाह चीफ नसरल्लाहला मारण्यासाठी इस्रायलने एक खास रणनिती बनवली होती. इस्रायलने नसरल्लाह विरोधी ऑपरेशनला ‘न्यू ऑर्डर’ नाव दिलं होतं. इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी न्यू यॉर्कला रवाना होण्याआधी ऑपरेशन ‘न्यू ऑर्डर’ सुरु केलं होतं. इस्रायलला जशी नसरल्लाहच्या अचूक लोकेशनची माहिती मिळाली, त्यांनी आपलं सर्वात घातक शस्त्र डागलं. क्षणभरात हिज्बुल्लाह चीफचा शेवट झाला.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.