History : 19 वर्षे सुरु राहिलेला रक्तरंजित संघर्ष, 20 लाखांहून अधिक लोकांचे बळी, अखेर ‘या’ देशातून अमेरिका बाहेर पडला

व्हिएतनाम युद्धात अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये व्हिएतनामचे तब्बल 20 लाख सैनिक आणि सामान्य नागरिक बळी ठरले. या युद्धात अमेरिकेने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं

History : 19 वर्षे सुरु राहिलेला रक्तरंजित संघर्ष, 20 लाखांहून अधिक लोकांचे बळी, अखेर 'या' देशातून अमेरिका बाहेर पडला
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 6:01 PM

हनोई (Hanoi) : दुसऱ्या जागतिक युद्धानंतर (Second World War) संपूर्ण जग दोन गटात विभागलं गेलं. एकीकडे अमेरिका (America) आपली भांडवलवादी विचारसरणी जगावर थोपवू पाहत होता. दुसरीकडे सोवियत संघ (Soviet Union) आपली कम्युनिस्ट विचारसरणी पसरवण्याचा प्रयत्न करत होता. अमेरिका आणि सोवियत संघाच्या या चढाओढीत अनेक देश उद्ध्वस्त झाले. यातील दोन मुख्य देश म्हणजे उत्तर व्हिएतनाम (North Vietnam) आणि दक्षिण व्हिएतनाम (South Vietnam). या युद्धात व्हिएतनामचे तब्बल 20 लाख सैनिक आणि सामान्य नागरिक बळी ठरले. या युद्धात अमेरिकेने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं (History of 29 March about Vietnam War America and Soviet Union).

या युद्धात व्हिएतनामचं मोठं नुकसान झालं, मात्र व्हिएतनामनेही चिवट संघर्ष केला. यात अमेरिकेलाही आपले 58 हजार सैनिक गमवावे लागले. या युद्धात उत्तर व्हिएतनामला सोवियत संघ, चीन आणि इतर कम्युनिस्ट देशांनी पाठिंबा दिला. दुसरीकडे दक्षिण व्हिएतनामला अमेरिका, दक्षिण कोरिया, फिलीपींस, ऑस्ट्रेलिया, थायलंड आणि इतर कम्युनिस्ट विरोधी भांडवलदार देशांनी पाठिंबा दिला. व्हिएतनाम युद्धात अमेरिकेने जोरदार शक्तीप्रदर्शन करत अनेक हल्ले केले. यात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. या युद्धाबाबत आजचा दिवस (29 मार्च) महत्त्वाचा आहे, कारण आजच्याच दिवशी अमेरिकेने आपलं सर्व सैन्य व्हिएतनाममधून माघारी बोलावलं आणि युद्ध संपलं.

युद्ध संपवण्यासाठी पॅरिसमध्ये शांतता करारावर स्वाक्षरी

अमेरिकेने 1954 मध्ये व्हिएतनाममध्ये युद्धाला सुरुवात केली. हे युद्ध 1973 पर्यंत म्हणजेच एकूण 19 वर्षे सुरु राहिलं. या काळात अमेरिकेत 3 राष्ट्राध्यक्ष बदलले. 29 मार्च 1973 रोजी शेवटचा अमेरिकन सैनिक व्हिएतनामच्या जमिनीवरुन माघारी परतला. शांतता कराराने युद्धातील अमेरिकेचा सहभाग संपला. या पॅरिस करारानुसार अमेरिकेच्या सैनिकांनी सन्मानाने व्हिएतनाम बाहेर जाण्याचं ठरलं. तसेच युद्धबंदी असलेल्या सैनिकांनाही सोडून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

पॅरिस करारातील मुख्य अटी

पॅरिस शांतता करारात युद्ध समाप्तीची घोषणा करण्यासोबतच इतरही मुख्य गोष्टींवर निर्णय झाला. यानुसार अमेरिकेचं सैन्या मागे घेणं, युद्ध बंदी सैनिकांना सोडणं आणि शांततापूर्ण मार्गाने उत्तर आणि दक्षिण व्हिएतनामचं एकिकरण करण्याचा निर्णय झाला. याशिवाय व्हिएतनाममध्ये नव्याने निवडणूक होऊन सरकार स्थापन होईपर्यंत दक्षिण व्हिएतनामचं सरकार कायम ठेवणं आणि दक्षिण भागातील उत्तर व्हिएतनाम सैनिकांनी पुढे न सरकणं याही अटी मान्य करण्यात आल्या.

हेही वाचा :

4 लाख मुलांचा मृत्यू होण्याची शक्यता, 12 लाख गरोदर महिलांवरही संकट, UN चा गंभीर इशारा

‘या’ देशात 5 लाख लोकांचा बळी, आता कुपोषणाचं संकट, भारताचा मदतीचा हात

चीन आणि पाकिस्तानशी एकाचवेळी युद्ध झाल्यास भारत काय करणार?

व्हिडीओ पाहा :

History of 29 March about Vietnam War America and Soviet Union

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.