सौदीच्या तेल विहिरींवर हल्ले, पेट्रोल-डिझेल दरवाढीने होरपळणाऱ्या भारताला पुन्हा चटके
सौदी अरेबियाच्या तेल विहिरींवरील हल्ल्यांचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये झाला आणि तेलांच्या किमंती तीन टक्क्यांनी वाढल्या. Houthi rebel strike Saudi Arabia
नवी दिल्ली: रविवारी सौदी अरेबियाच्या तेल उत्पादित होणाऱ्या विहिरींवर आणि ठिकाणांवर हल्ले झाले. तेल ठिकाणांवरील हल्ल्यांचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये दिसून आला. आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये तेलांच्या किमंती तीन टक्क्यांनी वाढल्या. क्रुड ऑईलचा एक बॅरल 71.37 अमेरिकन डॉलर वर जाऊन पोहोचला. तेलाच्या वाढलेल्या दराचा परिणाम भारतावर देखील होणार असून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती चढ्या राहू शकतात. भारताला सर्वाधिक खर्च खनिज तेल आयात करण्यावर करावा लागतो. (Houthi rebel strike Saudi Arabia facilities in Ras Tanura which affect Indian Economy)
सौदी अरेबिया सर्वात मोठा तेल उत्पादक
सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. भारत सर्वाधिक तेलाची आयात सौदी अरेबियाकडून करतो. भारत हा जगातील खनिज तेल आयात करणारा अमेरिका आणि चीननंतर सर्वात मोठा देश आहे. भारतानं गेल्या आर्थिक वर्षात 85 टक्के तेल आयात केले होते तर त्यासाठी 120 अब्ज डॉलर खर्च केले होते. यामुळे सौदी अरेबियाच्या तेल विहिरींवरील हल्ल्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर सर्वाधिक परिणाम होऊ शकतो. रविवारी सौदी अरेबीयाच्या रास तुनरा या ऑईल टर्मिनलवर हल्ला झाला होता. सौदी अरेबियाच्या ऊर्जा मंत्रालयानं हल्ला झाल्याचं मान्य केलं आहे. इराणचं समर्थन असलेल्या हुथी बंडखोरांच्या गटानं सौदी अरेबियाच्या रास तनुरा टर्मिनलवर हल्ला केला होता.
आंतराराष्ट्रीय बाजारतील वाढत्या दरांची समस्या
2020 मध्ये फेब्रुवारी महिन्यात क्रुड ऑईलच्या किमती 20 अमेरिकन डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोहोचल्या होत्या. वर्षभरात त्यामध्ये 83 टक्के वाढ झाली आहे. भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या वाढत्या किमती कारणीभूत ठरत असल्याचा दावा केला जातो.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईलचे दर 10 डॉलरनं वाढल्यास भारत सरकारचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो. सध्या भारतातीn पेट्रोल चे दर 100 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
महिलांसाठी केंद्रातर्फे चालवल्या जाणाऱ्या ‘या’ तीन विशेष योजना; थेट 10 लाखांची कमाई#internationalwomensday2021 #happywomensday #PMJDY #PMMYhttps://t.co/m8f8QGIJto
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 8, 2021
सबंधित बातम्या:
…तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आणखी भडकणार; ‘हे’ एक मोठे कारण
एलपीजीच्या दरवाढीतून मिळेल दिलासा, 50 रुपये वाचतील, त्यासाठी अशी करा बुकिंग
( Houthi rebel strike Saudi Arabia facilities in Ras Tanura which affect Indian Economy)