दानिश सिद्दीकींना कसं मारलं तालिबाननं? डोकं सुन्न करणारा घटनाक्रम, भारतीयांचा किती तिरस्कार करणार?
तालिबान प्रवक्ते पुढं म्हणाले की, युद्ध असणाऱ्या भागात एखादा पत्रकार येत असेल तर त्याची माहिती आम्हाला दिली पाहिजे. अशा व्यक्तींना काही इजा होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.
भारतीय फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांची गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी हत्या केली. रॉयटर्स ह्या वृत्तसंस्थेचे ते प्रतिनिधी म्हणून अफगाणिस्तानमध्ये युद्धाचं वार्तांकन करत होते. फोटो टिपत होते. असच एक मिशन कव्हर करत असताना, कंदहार शहरात त्यांची तालिबाननं हत्या केली. ह्या हत्येचा घटनाक्रम आता समोर येतोय. तालिबानी भारतीयांचा किती तिरस्कार करतात तेच ह्या घटनाक्रमावरुन दिसून येतं. एवढच नाही तर तालिबान्यांसाठी हिंसा, क्रुरता हा एकच धर्म असल्याचही दिसून येतं.(Photo Journalist Danish Siddiqui)
तालिबान्यांची क्रूरता दानिश सिद्दीकींची हत्या कशी करण्यात आली याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. अफगाण लष्करातील एका कमांडरच्या हवाल्यानं हे वृत्त आहे. अफगाण कमांडर बिलाल अहमद यांनी सांगितलं- तालिबानी दहशतवाद्यांनी आधी दानिशला गोळ्या घातल्या. त्यात त्यांचे प्राण गेले. नंतर तालिबान्यांना दानिश भारतीय असल्याचं लक्षात आलं. त्यावेळेस त्यांच्या डोक्यावरुन तालिबान्यांनी गाडी घातली. अशा प्रकारे तालिबान्यांनी आधी दानिशला मारलं आणि नंतर त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली.
Danish Siddiqui covered war zones and crises from Iraq to Hong Kong to Nepal. He was killed on Friday covering Afghan-Taliban clashes near the Pakistan border. Here is some of the Pulitzer Prize-winning photographer’s best work from the past decade: https://t.co/OJmNdQCTik pic.twitter.com/NMJTP2ltGC
— Reuters Pictures (@reuterspictures) July 17, 2021
दानिश सिद्दीकींचा बळी कसा गेला? अफगाण लष्करी कमांडर बिलाल अहमद यांनी पुढं सांगितलं की, पाकिस्तानच्या सीमेलगत भाग आहे स्पीन बोल्डक. हा शहरी भाग आहे. तालिबानी आणि अफगाण फोर्सेसची इथं चकमक झाली. ह्या धुमश्चक्रीच्या काळात दानिश सिद्दीकी आणि एका अफगाण लष्करी अधिकाऱ्याला तालिबान्यांनी गोळ्या घातल्या. दानिश सिद्दीकी हे फोटो जर्नलिस्ट आहेत, ते भारतीय आहेत हे लक्षात आल्यानंतर तर तालिबान्यांनी दानिशच्या डोक्यावरुन गाडी घातली.
The Humvee in which I was travelling with other special forces was also targeted by at least 3 RPG rounds and other weapons. I was lucky to be safe and capture the visual of one of the rockets hitting the armour plate overhead. pic.twitter.com/wipJmmtupp
— Danish Siddiqui (@dansiddiqui) July 13, 2021
तालिबानचं नेमकं म्हणणं काय? दानिश सिद्दीकींच्या मृत्यूवर आधी तर तालिबान्यांनी शोक व्यक्त केला पण नंतर त्यांनी त्यांचा खरा चेहरा दाखवला. तालिबानचे प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद म्हणाले-दानिश सिद्दीकींच्या मृत्यूला तालिबान जबाबदार नाही. ते ह्या भागात काम करतायत किंवा आहेत याची आम्हाला माहिती दिलेली नव्हती. नेमका कुठे दानिश सिद्दीकींचा मृत्यू झाला याचीही आम्हाला कल्पना नाही. एवढच नाही तर दानिशचा मृत्यू कसा झाला तेही माहिती नाही. तालिबान प्रवक्ते पुढं म्हणाले की, युद्ध असणाऱ्या भागात एखादा पत्रकार येत असेल तर त्याची माहिती आम्हाला दिली पाहिजे. अशा व्यक्तींना काही इजा होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.