Explainer : नव्या पोपची निवड कशी होते? काळ्या, पांढऱ्या धुराचं काय आहे कनेक्शन?
ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर नव्या पोपची निवड केली जाणार आहे. मार्च 2013 मध्ये पोप फ्रान्सिस यांची निवड झाली होती. ते अमेरिकेतून निवडलेले पहिले पोप होते.

ख्रिस्ती धर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. ते ब्रॉकायटिसने आजारी होते. त्यांना शुक्रवारी रुग्णालयात भरती केले होते. शनिवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता त्यांची तब्येत खालावलेली होती. आज अखेर त्यांचे निधन झाल्याचे व्हेटीकन सिटीने ( Vatican City ) जाहीर केले आहे. त्यामुळे जगभरातील ख्रिस्ती समाजात दु:खाची लाट पसरली आहे. मार्च 2013 मध्ये पोप फ्रान्सिस यांची निवड झाली होती. ते अमेरिकेतून निवडलेले पहिले पोप होते. आता त्यांच्यावर अंत्य संस्कार झाल्यानंतर नव्या पोपची निवड केली जाणार आहे. आता नव्या पोपची निवड नेमकी कशी केली जाते याकडे जगाचे लक्ष लागले आहे… ...
