1000 रुपयांना आलं आणि 30 रुपयाला अंडे, महागाईने पाकिस्तानमध्ये उपासमारीची वेळ

पाकिस्तानमध्ये (Pakistan) महागाईने उच्चांक गाठलाय. महागाईच्या वणव्यात होरपळणारी जनता अगदी त्रासून गेलीय.

1000 रुपयांना आलं आणि 30 रुपयाला अंडे, महागाईने पाकिस्तानमध्ये उपासमारीची वेळ
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 11:11 PM

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये (Pakistan) महागाईने उच्चांक गाठलाय. महागाईच्या वणव्यात होरपळणारी जनता अगदी त्रासून गेलीय. सर्व सामान्य नागरिकांना स्वयंपाक करणं देखील अवघड झालंय. पाकिस्तानमध्ये कोंबड्या आणि मांसाची (Chicken and Meat) किंमत अचानक वाढलीय. त्यामुळे लोक पंतप्रधान इमरान खान (Pak PM Imran Khan) यांना लक्ष्य करत आहे. मांसाशिवाय अंडे (Eggs) आणि आल्याचे (Ginger) दरही गगनाला भिडले आहेत. रावळपिंडीत (Rawalpindi) अंड्याच्या किमती 350 रुपये प्रति डझन झाल्यात, तर आल्याची किंमत 1000 रुपये प्रति किलो झालीय (Huge Price hike in Pakistan People are angry on Imran Khan Government).

बिघडलेल्या आर्थिक स्थितीत पाकिस्तानमध्ये आधीच धान्य आणि पिठाची कमतरता होतील. आता स्वयंपाक घरातील इतर वस्तू देखील महागल्याने सर्वसामान्य हैराण आहेत. पाकिस्तानमधील ARY न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, कराचीत जिवंत कोंबड्याची किंमत 370 रुपये प्रति किलो आणि मांस 500 रुपये प्रति किलो झालंय. त्यामुळेच पाकिस्तानमधील जनतेच्या मनात या महागाई विरोधात असंतोष आहे.

बाहेर देशातून वस्तूंची आयात करण्याचा विचार

पाकिस्तानमध्ये कच्चा माल आणि चाऱ्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने कोंबड्या आणि अंड्याच्या किमतीत वाढ झाल्याचं सांगितलं जातंय. सध्या पोल्ट्री चालकांचा खर्च अधिक होत असल्याने किमती वाढल्या आहेत. काही दिवसात या किमती कमी होतील असा दावा स्थानिक विक्रेत्या संघटनांनी केलाय.

पाकिस्तानमध्ये घरगुती गॅसचाही तुटवडा

मागील काही दिवसांमध्ये पंजाब आणि खैबर पख्तूनख्वामधून अनेक भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्यानंतर इमरान खान यांनी चलनवाढ रोखण्यासाठी बाजार समित्याच बरखास्त केल्या. त्यातच मास आणि भाजीपालाही महागला. याशिवाय पाकिस्तानमध्ये लोकांना घरगुती गॅसही मिळेनासा झालाय. 2021 च्या सुरुवातीपासूनच पाकिस्तान गॅस तुटवड्याचा सामना करत आहे.

‘साखरेचे दर’ कमी करण्याला इमरान खान सरकारचं यश मानतात

पाकिस्तानमधील महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दुसरीकडे इमरान खान साखरेचे दर 102 रुपयांवरुन 81 रुपये केल्याचं श्रेय घेत स्वतःच्या सरकारचं कौतुक करण्यात गुंग आहेत. त्यामुळे अशा स्थितीत सर्वसामान्यांना दिलासा कसा मिळणार हाच प्रश्न आहे.

हेही वाचा :

1 अंडे 30 रुपयाला, साखर 81 रुपये किलो, पाकिस्तानात 1 किलो मटणाचा दर किती?

भारत आणि पाकिस्तानमधील संसदेत काय फरक? राज्यसभा-लोकसभेऐवजी पाकमध्ये ‘या’ संस्था

भारताचा शेजारी कारगिल 2 च्या तयारीत? युद्धाची भाषा करत पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र खरेदी

व्हिडीओ पाहा :

Huge Price hike in Pakistan People are angry on Imran Khan Government

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.