सरकार मला लष्कराबरोबर लढायला लावत आहे, मुर्खांनी देश काबीज केला; इम्रान खान यांचा हल्लाबोल
इम्रान खान यांनी सांगितले की, माझ्या अटकेनंतर पोलिसांनी शांततापूर्ण आंदोलकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये किमान 25 नागरिक ठार झाले आणि शेकडो जखमी झाले. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी.
नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) प्रमुख इम्रान खान यांनी पुन्हा एकदा शहबाज शरीफ सरकारवर हल्लाबोल केला आहे. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफला संपवण्याचा सरकारचा डाव असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे. आता मला पुन्हा अटक करून तुरुंगात टाकले जाऊ शकते. त्यामुळे सरकार मला लष्कराशी लढायला लावत आहे, पण कोणीही स्वत:च्या सैन्याशी लढू शकत नसल्याचेही मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
माझ्या अटकेनंतर झालेल्या हिंसाचारात पोलिसांच्या गोळीबारात झालेल्या मृत्यूंची चौकशी व्हायला हवी, असंही इम्रान खान यांनी सांगितले.
या हिंसाचारात पीटीआयच्या 25 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. पोलीस त्यांना दहशतवादी म्हणत आहेत. जर ते दहशतवादी असतील तर पोलिसांनी त्यांची छायाचित्रे अद्याप का प्रसिद्ध केली नाहीत.
इम्रान खान यांनी ट्विट केले होते की, देशात गुन्हेगार आणि मूर्खांच्या गटाचे वर्चस्व आहे जे नैतिकता आणि मूल्ये पूर्णपणे विरहित आहेत.
میری ہمدردیاں ان سب کے ساتھ ہیں جن پر دباؤ ڈال کر انہیں جماعت چھوڑنے پر مجبور کیا جارہا ہے۔
خراجِ تحسین کے ساتھ میں ان تمام سینئر اراکین کو سلام پیش کرتا ہوں جو جماعت سے علیحدگی کیلئے پڑنے والے سنگین دباؤ کی ڈٹ کر مزاحمت کررہے ہیں۔
حقیقی آزادی کیلئے ثابت قدمی دکھانے پر قوم…
— Imran Khan (@ImranKhanPTI) May 18, 2023
अशा वेळी जेव्हा देश सर्वात वाईट आर्थिक संकट, इतिहासातील सर्वोच्च महागाई आणि वाढती बेरोजगारी यांच्याशी झुंजत आहे, तेव्हा सत्ताधारी पक्ष आपली सर्व शक्ती देशातील सर्वात मोठ्या आणि एकमेव संघीय पातळीवरील राजकीय पक्षासाठी वाहून घेतले आहे.
इम्रान खान यांनी ट्विट केले होते की, देशात गुन्हेगार आणि मूर्खांच्या गटाचे वर्चस्व आहे. जे नैतिकता आणि मूल्ये पूर्णपणे विरहित आहेत.
अशा वेळी जेव्हा देश सर्वात वाईट आर्थिक संकट, इतिहासातील सर्वोच्च महागाई आणि वाढती बेरोजगारी यांच्याशी झुंजत आहे, तेव्हा सत्ताधारी पक्ष आपली सर्व शक्ती देशातील सर्वात मोठ्या आणि एकमेव संघीय पातळीवरील राजकीय पक्षासाठी वाहून घेत आहे. खूप उशीर होण्यापूर्वी संपूर्ण देशाने याविरोधात आवाज उठवण्याची वेळ आली असल्याचेही सांगण्यात आले आहे.
इम्रान खान यांनी सांगितले की, माझ्या अटकेनंतर पोलिसांनी शांततापूर्ण आंदोलकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये किमान 25 नागरिक ठार झाले आणि शेकडो जखमी झाले. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी. फ्रान्समध्ये निदर्शने झाली. आंदोलक पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब फेकतानाही दिसले, परंतु पोलिसांनी कधीही प्रत्युत्तर दिले नाही.