अहो आश्चर्यम् ! बेबी बंप नव्हता, ना प्रेग्नन्सीची लक्षणे दिसली, पण बाथरूमला गेली अन् बाळ हातात घेऊन आली
गरोदर महिलेचा गर्भावस्थेच्या नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला की, तिला तीव्र वेदना सहन कराव्या लागतात. या दुखण्याला प्रसूती वेदना असे म्हणतात. पण अशा कोणत्याच वेदना न जाणवता अचानक मूल जन्माला आले तर काय?
नवी दिल्ली : अनेकवेळा अशा बातम्या आपल्याला ऐकायला येतात किंवा आपल्या समोर येतात, ज्यावर विश्वास ठेवणे (can not believe it) खूपच कठीण जाते. असाच एक धक्कादायक किस्सा सध्या चर्चेत आहे. जिथे एक महिला वॉशरूममध्ये (washrooms) गेली आणि हातात मूल घेऊन बाहेर आली! आश्चर्याची गोष्ट म्हणजे या महिलेला ना बेबी बंप होता ना प्रेग्नन्सीची (pregnancy symptoms) कोणीतीही लक्षणे जाणवली. एवढंच नव्हे तर तिला पीरियड्सची कोणतीच समस्याही नव्हती. मात्र एक दिवस ती बाथरूमला गेली आणि बाहेर आली तेव्हा तिच्या हातात एक नवजात बाळ होतं. महिलेने अशा प्रकारे मुलाला जन्म देऊन सर्वांनाच आश्चर्यचकित केले.
रिपोर्ट्सनुसार, ही घटना जॉर्जिया येथे घडली आहे. येथे राहणाऱ्या 34 वर्षीय मार्ला मॅकएंटायरने तिची कथा टिकटॉकवर शेअर केली. त्यामध्ये तिने सांगितले की, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात तिच्या पोटातच अचनाक दुखू लागले आणि खूपच वेदना होऊ लागल्या. ॲसिडिटीमुळे या वेदना होत असल्याचे तिला वाटले, पोट साफ होण्यासाठी ती वॉशरूममध्ये गेली. मात्र त्याचवेळी तिची प्रसूती झाली आणि एक मुलगा जन्माला आला. हे दृश्य पाहून मार्ला घाबरली कारण तिचं बाळ टॉयलेटच्या पाण्यात बुडालं असतं. तिने लगेच त्या बाळाला उचलून छातीशी धरलं
काही कळलंच नाही कस बाळ झालं ?
इथे सर्वात आश्चर्याची आणि हैराण करणारी गोष्ट म्हणजे मॅकएंटायरला तिच्या प्रेग्नेंसीबद्दल काहीच माहिती नव्हती. तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, मार्लाने सांगितलं की, ऑगस्टमध्ये एकदा जेव्हा तिची मासिक पाळी चुकली तेव्हा तिने प्रेग्नन्सी टेस्ट केली होती, पण तेव्हा निगेटीव्ह रिझल्ट आला होता. म्हणूनच तिची खात्री पटली की ती गरोदर नाही, कारण काही दिवसांनी तिला मासिक पाळी पुन्हा येऊ लागली. त्यामुळे तिला तिच्या गर्भधारणेची जाणीवही झाली नाही.
एवढंच नव्हे तर जानेवारी महिन्यातही ती काही कारणासाठी डॉक्टरांकडे गेली होती, तेव्हाही त्यांना तिच्या गरोदरपणाबद्दल समजले नाही. ना तिचे पोट दिसत होते, ना गरोदरपणाची इतर काही लक्षणे जाणवत होती. डॉक्टरांना मला माझ्या गरोदरपणाबद्दल काहीही सांगितले नाही, असेही मार्लाने नमूद केले.
या घटनेनंतर मॅकएंटायरच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. मार्ला तिच्या बाबांसोबत राहते. ती बाथरूमला गेली तेव्हा जोरजोरात ओरडत होती, पोटदुखीमुळे ते असेल असे मला वाटले. पण त्या प्रसूती वेदना आहेत, हे आता समजते आहे, असे तिच्या बाबांनी सांगितले. थोड्या वेळाने ती बाहेर आली तेव्हा तिच्या हातात नवजात बाळ होतं. त्याला नीट श्वासोच्छ्वास करता यावा म्हणून आधी बाळाला नीट स्वच्छ करण्यात आले.
या व्हिडिओमध्ये मार्ला असेही म्हणाली की, बाळासोबत कोणताही अनुचित प्रकार अथवा घटना घडू नये, अशी मला भीती वाटते. म्हणून मी त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले, तेथे त्याची नीट तपासणी करण्यात आली व बाळ पूर्णपणे निरोगी असल्याचे डॉक्टरांना आढळले. त्यानंतरच मी आणि माझ्या कुटुंबाने सुखाचा श्वास घेतला, असेही मार्लाने नमूद केले. ही आगळीवेगळी प्रसूती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.