कोण किती पाण्यात?, कोणत्या देशाचं नौदल तुफानी ताकदीचं?

1971 च्या युद्धात भारत जिंकला. मात्र, याच युद्धामुळे अमेरिकेच्या नौदलानं स्वतःला सज्ज केलं.

कोण किती पाण्यात?, कोणत्या देशाचं नौदल तुफानी ताकदीचं?
Follow us
| Updated on: Aug 10, 2020 | 11:30 PM

मुंबई : 1971 मधलं भारत-पाकिस्तान युद्ध, ज्या युद्धानंतर बांग्लादेशची निर्मिती झाली (India America Russia Navy). या युद्धात भारतानं पाकिस्तानविरोधात दोन ठिकाणांवरुन युद्ध छेडलं होतं. पहिलं अरबी समुद्र आणि दुसरं म्हणजे बंगालची खाडी. 4 डिसेंबर 1971 च्या (1971 India-Pakistan War) रात्री भारतीय नौदलाची ताकद साऱ्या जगानं पहिल्यांदाच पाहिली. याच रात्री पाकिस्तानचं PNS खैबर जहाज भारतानं उद्ध्वस्त केलं (India America Russia Navy).

पाकिस्तानी नौदलाचं मुख्यालय भारताच्या टार्गेटवर होतं. त्यानंतर तिथल्या मुख्यालयात लागलेली आग अनेक दिवसांपर्यंत भडकत राहिली. भारताच्या एकाच वारानं पाकिस्तानी नौदलाची अर्धी ताकद गारद केली. युद्धाच्या पहिल्या चारच दिवसात पाकिस्तानी सैन्य खिळखिळ झालं. मात्र, तेवढ्यात भारत-पाकिस्तानच्या या युद्धात अमेरिकेची एन्ट्री झाली. भारतीय सैन्यानं पाकिस्तानला जवळ-जवळ गुडघ्यावर आणलं होतं. मात्र, तोच अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती निक्सन पाकिस्तानच्या मदतीला धावले आणि भारताविरोधात अमेरिकेची विशालकाय युद्धनौका बंगालच्या खाडीत उतवरली गेली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

अशा संकटात रशिया भारताच्या पाठिशी उभा राहिला. अमेरिकेनं बंगालच्या खाडीत पाय ठेवताच रशियानं सुद्धा दंड थोपटले. अमेरिकेच्या युद्धनौकेविरोधात रशियानं थेट घातक पाणबुडी उतरवली. रशियानं पाणबुडी उतरवल्याची बातमी पसरताच अमेरिकेची युद्धनौका समुद्रातच स्थितप्रज्ञ झाली. रशियाच्या ताकदीपुढे अमेरिकेन नौदल समुद्रात एक इंचभरही पुढे सरकलं नाही आणि इकडे भारतानं पाकिस्तानला हरवून बांग्लादेशची निर्मिती केली (India America Russia Navy).

1971 च्या युद्धात भारत जिंकला. मात्र, याच युद्धामुळे अमेरिकेच्या नौदलानं स्वतःला सज्ज केलं. रशियाच्या ताकदीपुढे माघारी फिरल्याचं शल्य अमेरिकेला बोचत होतं. म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत अमेरिकेनं सर्वाधिक पैसे नौदलावर खर्च केला. त्याच मेहनतीमुळे अमेरिकेचं नौदल आज जगातलं सर्वात शक्तिशाली नौदल मानलं जातं.

अमेरिका, रशिया आणि चीन या तीन मोठ्या देशांची जर तुलना केली. तर, रशियाची आर्मी ही अमेरिकेहून शक्तिशाली आहे. चीनकडे अमेरिकेपेक्षा जास्त सैन्य आहे. पण, जेव्हा समुद्राचा विषय येतो, तेव्हा अमेरिकन नौदलच समुद्रातला शिकारी मानला जातो. त्यामुळेच मागच्या दशकभरपासून रशिया आणि चीन नौदलाची ताकद वाढवत आहेत. अमेरिकन नौदलाला उत्तर देऊ शकतील, असे अनेक प्रकल्प रशियात सुरु आहेत. म्हणून भविष्यात जर तिसरं युद्ध सुरु झालंच, तर ते समुद्रातूनच होईल. समुद्रच कोण किती पाण्यात आहे, याचाही फैसला करेल.

India America Russia Navy

संबंधित बातम्या :

रशियातील कोरोना लसीच्या चाचणीचे तिन्ही टप्पे पूर्ण, जगात कुठे काय घडतयं?

J-15 Jet | हवेतल्या हवेत इंधन भरण्याची क्षमता, चीनचं J15 फायटर प्लेन सज्ज

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.