बांग्लादेशने दगा दिला तर भारताची किती तयारी ?,भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश, कोणाची ताकद किती?

बांगलादेशाचे भारताशी संबंध बिघडलेले आहेत. अशात भारताचा हा एकेकाळचा मित्र जर उलटला तर भारताला एक नवा शत्रू तयार झाल्याने भारताला निर्धास्त राहता येणार नाही. त्यामुळे दोन्ही देशाचे संबंध तणावाचे असताना या देशाची ताकद किती पाहूयात...

बांग्लादेशने दगा दिला तर भारताची किती तयारी ?,भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश, कोणाची ताकद किती?
Follow us
| Updated on: Jan 07, 2025 | 11:03 PM

भारत आणि पाकिस्तानातील हाडवैर साऱ्या जगाला माहिती आहे. साल १९४७ फाळणीनंतर दोन्ही देशातील दुश्मनीत फरक पडलेला नाही. आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानात चार युद्ध झालेली आहेत. सर्व युद्धात पाकिस्तानला धुळ चाटावी लागली आहे. साल १९७१ मध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे करुन पूर्व पाकिस्तानचा लचका तोडून बांग्लादेश निर्मिती झाली आहे.बांगलादेश आणि भारताचे नाते अनेक वर्षे चांगले आहे. परंतू बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना परागंदा व्हावे लागल्यानंतर त्यांना भारतात आश्रय दिल्याने दोन्ही देशाचे संबंध बिघडले आहेत. आता दोन्ही देशात तणाव आहे. या स्थितीत या तिन्ही देशाचे सैनिकी  बलाबल काय आहे हे पाहूयात…

वर्ल्ड रँकींगमध्ये तिन्ही देशात कोण पुढे?

ग्लोबल फायर पॉवर मिलिट्री रँकींगमध्ये १४५ देशांना सामील केले आहे. या ताकदवान देशात बांग्लादेशाचे लष्कर ३७ व्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान नवव्या स्थानावर आहे. भारताचा विचार केला तर भारत चौथ्या स्थानावर आहे.

शस्रास्रांमध्ये कोण पुढे ?

शस्रास्रांचा विचार केला तर बांग्लादेशाजवळ १३,१०० चिलखती वाहने, ३२० रणगाडे, ३० सेल्फ प्रोपेल्ड ७० रॉकेट आर्टीलरी आहेत.पाकिस्तान जवळ ५० हजाराहून अधिक चिलखती वाहने, ६०२ रॉकेट लॉन्चर आहेत तर भारताजवळ ४,६१४ रणगाडे, १,५१,२४८ चिलखती वाहने आणि १४० सेल्फ प्रोपेल्ड आर्टिलरी आहेत.

हे सुद्धा वाचा

वायू सेनेची ताकद किती

वायूसेनेचा विचार केला तर भारताकडे २,२९६ विमाने आहेत. यातील ६०६ लढावू फायटर जेट आहेत. तर बांग्लादेशाच्या वायूसेनेजवळ एकूण २१६ विमाने आहेत. यात केवळ ४४ जेट फायटर विमाने आहेत. पाकिस्तान वायू सेनेकडे एकूण १४३४ विमाने आहेत.

पाकिस्तान आणि बांग्लादेशा कोण ताकदवान ?

बांगलादेशात लष्करात सुमारे २,०४,००० सक्रीय लष्कर अधिकारी आहे. पाकिस्तानच्या सैन्याची कुमक ६,५४,००० इतकी आहेत. तर भारतीय सैन्यात सुमारे १४,५५,५५० लष्करी अधिकारी आणि कर्मचारी आहेत. याशिवाय निमलष्करी दलाच्या अनेक तुकड्या भारताकडे आहेत.

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.