India vs Canada | भारताबरोबर तणाव असताना कॅनडाचा मोठा निर्णय, थेट मुंबईशी संबंध

India vs Canada | भारताने कठोर भूमिका घेतल्यानंतर कॅनडाने सुद्धा आता एक मोठा निर्णय घेतलाय. ज्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. दहशतवाद्यांची पाठराखण करणाऱ्या कॅनडा विरोधात भारत सरकार आक्रमक आहे. येणाऱ्या दिवसात हा वाद आणखी चिघळू शकतो.

India vs Canada | भारताबरोबर तणाव असताना कॅनडाचा मोठा निर्णय, थेट मुंबईशी संबंध
India vs Canada
Follow us
| Updated on: Oct 21, 2023 | 12:01 PM

नवी दिल्ली : भारत-कॅनडामधील राजकीय संबंध बिघडले आहेत. दिवसेंदिवस हा तणाव वाढत चालला आहे. आता कॅनडाकडून एक नवीन निर्णय घेण्यात आला आहे. कॅनडाने आधी भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना हटवलं. त्यानंतर प्रत्युत्तरात भारताने कॅनडाच्या डिप्लोमॅट्सना देश सोडायला सांगितला. भारतातून 41 डिप्लोमॅट्सना मायदेशी बोलावलं, असं शुक्रवारी कॅनडाकडून सांगण्यात आलं. भारताने काही दिवसांपूर्वी कॅनडाला स्पष्टपणे सांगितलं होतं की, तुम्ही दिल्ली उच्चायोगातील तुमच्या कर्मऱ्यांना माघारी बोलवून घ्या. अन्यथा त्यांना इम्युनिटी मिळणार नाही. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर भारत-कॅनडामधील संबंध बिघडले. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप केला होता.

आता कॅनडाकडूनही असाच एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. कॅनडाने मुंबईतील आपलं व्हिसा आणि काऊन्सलर एक्सेस बंद करण्याचा निर्णय घेतलाय. आता ज्यांना कॅनडाला जायच असेल, त्यांना व्हिसासाठी हेड ऑफिस दिल्लीतून प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. कॅनडाने हा निर्णय का घेतला? त्यामागे कुठलही कारण सांगितलेलं नाहीय. मुंबई ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, नागरिक त्यांच्या समस्यांसाठी आम्हाल मेल करु शकतात. सध्या ऑफिसमधून सर्व कामकाज बंद आहे. व्हिसाशी संबंधित सर्व काम आता दिल्लीतील ऑफिसमधून चालतील. भारताची कठोर भूमिका

कॅनडाने जे आरोप केले, त्यानंतर भारताने कठोर भूमिका घेतली. भारताने कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्यास नकार दिला. भारताने जे निर्णय घेतले, त्यावर कॅनडाने प्रश्नचिन्ह निर्माण केलं. भारत आंतरराष्ट्रीय कायद्याच उल्लंघन करतोय, असं कॅनडाच म्हणण होतं. भारताशिवाय कॅनडा असा एक देश आहे, जिथे शिखांची संख्या जास्त आहे. भारतातून कॅनडामध्ये जाऊन स्थायिक झालेल्या शिखांची संख्या मोठी आहे. आज तिथल्या राजकारणात शीख महत्त्वाची भूमिका बजावतायत. त्यामुळेच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो मतांसाठी त्यांची बाजू घेतात. कॅनडामधून खलिस्तानी समर्थक नेहमीच भारतविरोधी कारवाया करत असतात. त्यावर ट्रूडो सरकारने कारवाई करावी, ही भारताची मागणी आहे.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.