टिंडरवर सुंदर महिलेचा मोह महागात पडला, गळ्यावर चाकू ठेवत 55 लाख रुपयांची लूट

टिंडर वापरताना सावधानता न बाळगल्यास आणि मोहाला बळी पडल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. हेच सांगणारी एक घटना दुबईत घडलीय.

टिंडरवर सुंदर महिलेचा मोह महागात पडला, गळ्यावर चाकू ठेवत 55 लाख रुपयांची लूट
Follow us
| Updated on: Feb 21, 2021 | 4:53 PM

दुबई (Dubai) : टिंडर हे डेटिंग अॅप तरुणांच्या गळ्यातील ताईत आहेत. त्यावर अनेकांना आपले जोडीदार मिळाल्याचीही उदाहरणं आहेत. मात्र, हे अॅप जितकं उपयोगाचं आहे तितकंच ते धोक्याचंही आहे. सावधानता न बाळगल्यास आणि मोहाला बळी पडल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. हेच सांगणारी एक घटना दुबईत घडलीय. दुबईत एका 33 वर्षीय भारतीय व्यक्तीची (Indian Man) टिंडर या डेटिंग अॅपवर काही सुंदर महिलांशी ओळख झाली. मात्र, याच ओळखीने या भारतीय व्यक्तीला आपले तब्बल 55 लाख रुपये गमवावे लागले (Indian man robbed of Rs 55 lakh in Dubai using Tinder App and massage offer).

दुबईतील या भारतीय व्यक्तीची टिंडरवर काही महिलांशी ओळख झाली. या ओळखीतूनच या महिलांनी त्याला दुबईतील एका मसाज पार्लरमध्ये (Fake Massage Parlour) बोलावलं. मात्र, हे खरं मसाज पार्लर नव्हतं तर खास अशा ग्राहकांना गळाला लावण्यासाठी तयार केलेलं ठिकाण होतं. संबंधित व्यक्ती या ठिकाणी पोहचल्यानंतर त्याच्याकडून तब्बल 55 लाख 30 हजार 806 रुपये लुटण्यात आले. गल्फ न्यूजमधील रिपोर्टनुसार, या प्रकरणी दुबईच्या न्यायालयात (Dubai Court) सुनावणी सुरु आहे. विशेष म्हणजे जगभरात अशा ऑनलाईन अॅपचा उपयोग करुन फसवणूक होत असल्याच्या अनेक घटना समोर येतायेत.

दुबईतील न्यायालयाच्या रेकॉर्डनुसार, “पीडित व्यक्तीने एका अॅपवर 200 दिरहममध्ये (3,950 रुपये) मसाज सेशनची ऑफर पाहिली. ही जाहिरात सुंदर महिलांच्या फोटोंसह दाखवली जात होती. संबंधित भारतीय व्यक्तीने या अॅपवर दिलेल्या नंबरवर मसाज सेंटरशी संपर्क केला. त्यांनी त्याला पत्ता सांगितला. त्यानुसार ही व्यक्ती या मसाज पार्लरमध्ये गेली आणि त्यांची फसवणूक झाली.

गळ्यावर चाकू ठेऊन पैसे ट्रान्सफर

पीडित व्यक्तीने सांगितलं, “मी अपार्टमेंटमध्ये चार आफ्रिकन महिलांना पाहिलं. त्यांनी भेटल्यानंतर मला एका फ्लॅटमध्ये नेलं. तेथे मला बंधक बनवून मला मारहाण करण्यात आली. तसेच गळ्यावर चाकू ठेऊन मोबाईलमधील बँकेचं अॅप सुरु करण्यास सांगितलं. यातून एका अन्य खात्यात पैसे पाठवण्यास सांगितले. पैसे न पाठवल्यास जीवे मारण्याचे धमकी दिली. या चार महिलांपैकी एका महिलेने माझं क्रेडिट कार्ड घेऊन जवळच्या एटीएममधून 30 हजार दिरहम (5,92,586 रुपये) काढले. दुसरीकडे अन्य एका महिलेने चाकूचा धाक दाखवत माझ्या बँक खात्यावरुन दुसऱ्या एका खात्यावर 2,50,000 दिरहम (49,38,219 रुपये) पाठवण्यास भाग पाडलं.”

टिंडरचा वापर करुन फसवणूक

पीडित व्यक्तीने सांगितलं, “संबंधित महिलांनी माझ्याकडून माझा आयफोन हिसकावून घेतला. त्यानंतर मला त्या अपार्टमेंटमधून जायला सांगितलं. मी माझ्या बँकेला याबाबत माहिती दिली आहे. तसेच पोलिसांकडेही तक्रार केलीय.” दुबई पोलिसांनी (Dubai Police) दिलेल्या माहितीनुसार आरोपी 4 महिलांपैकी तिघींना अटक करण्यात आली आहे. एक अद्याप फरार आहे. या तिनपैकी एका महिलेने आरोपीला टिंडरचा उपयोग करुन फसवल्याची कबुली दिलीय.

संयुक्त अरब अमिरातमधून (UAE) बाहेर पैसे पाठवले

आरोपी महिलेने सांगितलं, ” पीडित व्यक्तीला टिंडरवर सुंदर महिलेचा फोटो दाखवून मसाज सेवा देण्याचं आमिष दाखवण्यात आलं. तो सांगितलेल्या ठिकाणी आल्यावर त्याला फ्लॅटमध्ये बंधक बनवण्यात आलं. त्याला त्यांच्या बँक खात्यातून संयुक्त अरब अमिरातच्या (UAE) बाहेरील एका खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले.”

हेही वाचा :

डेटिंग अॅपवरुन 4 कोटी युझर्सचा खाजगी डेटा लीक

व्हिडीओ पाहा :

Indian man robbed of Rs 55 lakh in Dubai using Tinder App and massage offer

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.