Marathi News International International Yoga Day 2022 importance of International Yoga Day, its beginning and Prime Minister Narendra Modi yoga program 21 June all you need to know in marathi
International Yoga Day 2022 | जाणून घ्या… आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्व, सुरूवात आणि 2022ची थीम!
संपूर्ण जगासाठी 2022 च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम 'मानवतेसाठी योग' आहे. कोरोनाचा प्रभाव लक्षात घेऊन या योग दिनाची 'योग फॉर ह्युमॅनिटी' ही थीम निवडण्यात आलीये. कारण कोरोनाचा फक्त आपल्या शरीरावरच नाहीतर आपल्या मानसिक आरोग्यावरही खूप जास्त परिणाम झालायं. योगा केल्याने फक्त आपले शरीरच निरोगी राहत नाही तर योगा मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.
मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश आध्यात्मिक आणि शारीरिक साधनेच्या फायद्यांबद्दल जागरूकता पसरवणे आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी योगा अत्यंत महत्वाचा आहे. योगाचे महत्त्व अशा प्रकारे वाढत आहे की केवळ भारतच नाही तर जगभरातील लोक निरोगी (Healthy) राहण्यासाठी योगाची मदत घेत आहेत. दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. 21 जून ही आंतरराष्ट्रीय योग दिवसाची तारीख नेमकी काय निवडली गेलीये. तसेच यंदाची आंतरराष्ट्रीय (International) योग दिनाची थीम नेमकी काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
PIB India ने खास योगा डे निमित्त हे ट्विट केले आहे
2014 मध्ये युनायटेड नॅशनल जनरल असेंब्लीच्या 69 व्या सत्रात भाषण देताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्याचा प्रस्ताव दिला होता. 11 डिसेंबर 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा योग दिन प्रस्ताव 3 महिन्यांत बहुमताने स्वीकारण्यात आला आणि 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. 2015 रोजी योग दिनाची सुरुवात झाली, त्यानंतर जगभरात दरवर्षी 21 जून रोजी योग दिवस साजरा केला जातो.
योग फॉर ह्युमॅनिटी 2022ची थीम
संपूर्ण जगासाठी 2022 च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम ‘मानवतेसाठी योग’ आहे. कोरोनाचा प्रभाव लक्षात घेऊन या योग दिनाची ‘योग फॉर ह्युमॅनिटी’ ही थीम निवडण्यात आलीये. कारण कोरोनाचा फक्त आपल्या शरीरावरच नाहीतर आपल्या मानसिक आरोग्यावरही खूप जास्त परिणाम झालायं. योगा केल्याने फक्त आपले शरीरच निरोगी राहत नाही तर योगा मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.
खास योगा डे निमित्त हे ट्विट
#Yoga itself has started to reach out from person to person. There was a time when yoga was the path of spiritual practices for sages, in the caves of the Himalayas: PM @narendramodi
-2015 मध्ये पीएम मोदींनी योगाचा मंत्र संपूर्ण जगाराला दिला होता. यादरम्यान नवी दिल्लीतील राजपथ येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला 84 देशांचे नागरिक सहभागी झाले होते.
-2016 मध्ये चंदीगडमध्ये योगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पीएम मोदींनी तरुणांना योगासने करण्याचा मंत्र दिला होता. या कार्यक्रमात 30 हजार लोकांसह 150 दिव्यांगांचाही सहभाग होता.
-2017 मध्ये लखनऊमध्ये 51 हजार सहभागी लोकांसोबत पंतप्रधान मोदी यांनी योग दिवस साजरा केला होता. यावेळी पंतप्रधानांनी आरोग्यासाठी योगाचा मंत्र दिला होता.
-2018 मध्ये डेहराडूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 50,000 सहभागींसह योगा दिवसाचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी तरूणांचा सहभाग लक्षणिय होता.
-2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रांचीमध्ये योग दिवस साजरा केला. यावेळी पंतप्रधानांनी पर्यावरणासाठी योगाचा मंत्र दिला.
-2020 कोरोनाच्या काळात पीएम मोदींनी घरीच योगा दिवस साजरा केला, तसेच आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश देखील दिला.
-2021 मध्ये कोरोनाचे संकट असताना मोंदींनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी योगाचे महत्व समजून सांगितले. कोरोना असल्यामुळे मोठ्या कार्यक्रमांवर बंदी होती.
2022 कर्नाटकातील म्हैसूर येथे पीएम मोदींचा योगा कार्यक्रम
यंदाचा 8 वा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कर्नाटकातील म्हैसूर येथे आयोजित करण्यात आला आहे. योगादरम्यान पीएम मोदी मानवतेसाठी योगाचा संदेश देणार आहेत. यावेळी योग दिनानिमित्त देश-विदेशात काही अतिशय महत्वपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच भारतातील विविध शाळेंमध्ये योग दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त खास एक व्हिडीओ देखील तयार करण्यात आला आहे.