Apple स्टोअरमध्ये iPhone ची लूट, मास्कधारी युवकांची फिल्मी स्टाईल घुसखोरी, व्हिडीओ व्हायरल
आयफोनच्या स्टोअरमध्ये जवळपास शंभर मास्कधारी तरूणांनी लुटल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
न्युयॉर्क | 27 सप्टेंबर 2023 : आयफोन बनविणाऱ्या एप्पलने याच महिन्यात आपल्या आयफोन 15 मालिकेला सादर केले आहे. iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि 15 Pro Max या फोनची नवी मालीका सादर झाल्याने दुकानात झुंबड उडाली आहे. सर्वात महागड्या आयफोनची किंमत सुमारे दोन लाख रुपये आहे. अशात हे महागडे आयफोन लुटण्याच्या घटनेचा फिलाडेल्फिया येथील एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
इंटरनेटर दोन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. एका व्हिडीओत मुखवटे घातलेले तरुण एप्पलच्या स्टोअरमध्ये घुसताना दिसत आहे. त्याची संख्या सुमारे शंभर आहे. ते एकदम फिल्मी स्टाईलमध्ये आयफोनच्या शोररुममध्ये घुसून तेथील फोन चोरी करुन पळताना दिसत आहेत. अन्य एका व्हिडीओत दुकानात चोरी करुन पळणाऱ्या तरुण आणि तरुणींना पकडण्यात घटनास्थळी हजर झालेल्या पोलिसांना यश आले आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
‘Rules based order’ in Philadelphia last night. pic.twitter.com/hDCzE3shhR
— Shiv Aroor (@ShivAroor) September 27, 2023
काय आहे प्रकरण
पोलिसांनी म्हटले आहे की मंगळवारी 8 वाजता एप्पल स्टोअरला टार्गेट करण्यात आले आहे. अनेक टीनेजर मुले मास्क घालून स्टोअरमध्ये घुसले आहे. पोलीसांनी अनेक तरुण आणि तरुणींना पकडण्यात यश मिळविले आहे. त्यांच्याकडून डीसकार्डेड आयफोन आणि आयपॅड जप्त करण्यात पोलीसांना यश आले आहे.
निदर्शनाचा काही संबंध नाही
या घटनेच्या आधी दुपारी येथे एक शांततापूर्ण निर्दशने झाली होती. हा मोर्चा कोर्टाच्या एका निर्णयाविरोधात काढला होता. फिलाडेल्फियाच्या पोलीस अधिकाऱ्यावर एका ड्रायव्हरला मारल्याचा आरोप होता. परंतू कोर्टाने पोलिसांवरील आरोप फेटाळल्याने हा त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा होता. स्थानिक प्रशासनाने या लुटीचा आणि निदर्शनाचा काही संबंध नसल्याचे म्हटले आहे. कार्यकारी पोलिस अधिकारी जॉन स्टँडफोर्ड यांनी सांगितले की हे काम असामाजिक तत्वांचे दिसत आहे.