धक्कादायक, लँडिंगआधी काही अंतरावर विमान डोंगराला धडकलं, प्रवास करणाऱ्या सर्व 119 जणांचा मृत्यू

विमानांच्या अपघाताचं प्रमाण रस्त्यावरील अपघाताच्या तुलने फार कमी असतं. मात्र, झालेले अपघात अंगावर काटे आणणारे आणि हदरवणारे असतात.

धक्कादायक, लँडिंगआधी काही अंतरावर विमान डोंगराला धडकलं, प्रवास करणाऱ्या सर्व 119 जणांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 4:26 PM

Iran Air Tours Flight Crash तेहरान : विमानांच्या अपघाताचं प्रमाण रस्त्यावरील अपघाताच्या तुलने फार कमी असतं. मात्र, झालेले अपघात अंगावर काटे आणणारे आणि हदरवणारे असतात. असाच एक अपघात आजच्याच दिवशी 2002 मध्ये इराणमध्ये घडला होता. इराणच्या एअर टुर्सच्या विमानाचा मोठा अपघात झाला होता. धक्कादायक म्हणजे या विमान अपघातात विमानातील सर्वच्या सर्व 119 जणांचा मृत्यू झाला (Iran airplane 956 crash tupolev 2002 all 119 people died in accident on 12 February history).

अपघातग्रस्त विमान विमानतळापासून अवघ्या काही अंतरावर होतं, मात्र लँडिंग होण्याआधीच इराणमधील डोंगरावर धडकल्याने हा भीषण अपघात झाला. खुर्रमबाद विमानतळाजवळ (Khorramabad Airport) झालेल्या या अपघातात विमानाचा चक्काचूर झाला. हे विमान टुपोलेव टीयू-154 एम (Tupolev Tu-154M) या प्रकारातील होतं.

दक्षिण-पश्चिम तेहरानपासून 230 मैल आणि विमानतळापासून 15 मैल अंतरावर हा अपघात झाला. हे विमान विमानतळावर रनवे क्रमांक 11 वर उतरणार होतं. मात्र, त्यावरील नियंत्रण गेल्याने जवळच्या कुह-ए शफीद नावाच्या डोंगराला धडकलं. विमानाचा अपघात झाला तेव्हा 107 प्रवासी आणि 12 क्रू सदस्य विमानात होते. या सर्वांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये 4 सरकारी अधिकाऱ्यांचाही समावेश होता.

हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर इतक्या वर्षांनी देखील इराणचे नागरिक हा अपघात विसरु शकलेले नाहीत. कारण या अपघातात अनेकांनी आपले निकटवर्तीय गमावले होते. हा अपघात आजच्या दिवशी 12 फेब्रुवारी 2002 (12 Ferbuary History) रोजी घडला. हे विमान रशियाची कंपनी एविआकोरने (Aviakor) बनवलं होतं. कंपनीने या प्रकारातील पहिलं विमान 21 मे 1991 मध्ये तयार केलं होतं. जून 1991मध्ये हे विमान सेवेत दाखल झालं.

हेही वाचा :

‘आम्ही क्रॅश होणार आहोत’, ‘आई, आय लव्ह यू’… प्लेन क्रॅश होण्यापूर्वीचे अखेरचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील

Kerala Plane Crash : केरळ विमान दुर्घटना, बचाव कार्यातील 22 जणांना कोरोनाची लागण

Kerala Plane Crash Photos: केरळमध्ये विमानाचा थरकाप उडवणारा अपघात, 30 फूट खाडीत कोसळून दोन तुकडे

व्हिडीओ पाहा :

Iran airplane 956 crash tupolev 2002 all 119 people died in accident on 12 February history

Non Stop LIVE Update
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.
राणांच्या सभेत राडा; शिवीगाळ, खुर्च्या फेकून मारल्या, अल्लाहच्या घोषणा
राणांच्या सभेत राडा; शिवीगाळ, खुर्च्या फेकून मारल्या, अल्लाहच्या घोषणा.
भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध अन् महायुतीत अजित पवारांची कोंडी
भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध अन् महायुतीत अजित पवारांची कोंडी.
..तेव्हा गमंत केली आता नको, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा
..तेव्हा गमंत केली आता नको, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा.