AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण – लेबनॉनच्या नुसत्या धमक्या, अन् इस्राईलने हेजबोलाच्या तळांवर रात्रभर केले हल्ले

गेल्यावर्षी 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमास या अतिरेकी संघटनेने इस्रायलवर अचानक हवाई हल्ला केला.त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझापट्टीमध्ये सैन्य घुसवले आणि त्यानंतर सुरु झालेले युद्ध अजूनही सुरुच आहे.

इराण - लेबनॉनच्या नुसत्या धमक्या, अन् इस्राईलने हेजबोलाच्या तळांवर रात्रभर केले हल्ले
Hezbollah Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Aug 08, 2024 | 2:09 PM
Share

हमासचा म्होरक्या इस्माईल हनिये यांची इराणच्या राजधानी तेहरानमध्ये 31 जुलै रोजी हत्या करण्यात आली होती. या हत्येने संतापलेल्या इराणने इस्रायलला धडा शिकविण्याची शपथ घेतली होती. आणि आता इराण या हत्येचा नक्की बदला घेऊ शकतो आणि केव्हाही युद्धाचा भडका होऊ शकतो असे म्हटले जात होते. इराण आणि हेजबोला यांच्या धमक्यांनंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री एंटी ब्लिंकन यांनी देखील युद्ध केव्हाही भडकू शकते असा इशारा दिला होता. परंतू इराण आणि लेबनॉन यांच्या धमक्यांना भीक न घालता इस्रायलने हेजबोलाच्या अनेक तळांवर हल्ले करुन ते उद्धवस्त केले आहेत.

इराण आणि लेबनॉनचा तिळपापड

इस्रायलच्या उत्तर सीमेवरील लेबनॉन या देशातील हेजबोला ही दहशतवादी संघटना आहे. इस्रायलचे पंतप्रधान यांची सत्ता बळकट करण्यासाठी युद्धजन्य परिस्थिती पथ्यावर पडणारी असल्याने इस्रायलच्या सैन्याने इराणच्या राजधानी तेहराण येथे हमासचे तुलनेने मवाळ नेते असलेल्या इस्माईल हेनिया यांची कडेकोट निवासस्थान असलेल्या फ्लॅटमध्ये बॉम्बस्फोट करून हत्या केली आहे. त्यामुळे तेलसंपन्न असलेल्या आखातात मोठा तणाव निर्माण झाला आहे. या हत्याकांडाच्या एक दिवस आधी लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये हेजबोलाचा प्रमुख सैन्य कमांडर फऊद शुकर याची हत्या करण्यात आली होती. गाझापट्टीतील हमास संघटनेचा प्रमुख असलेला इस्माईल हेनिया हा इराणच्या नवीन राष्ट्राध्यक्षांच्या शपथग्रहण समारंभात सामील होण्यासाठी तेहराणला गेला होता. राष्ट्राध्यक्ष यांच्या निवासस्थानापासून अवघ्या काही किमी अंतरावरील सुरक्षा असलेल्या इमारतीत हमास प्रमुख इस्माईल हेनिया उतरला होता. तरीही त्याची हत्या घडविण्यात इस्रायल यशस्वी झाल्याने इराण वेडापिसा झाला आहे.

हेजबोला देखील आता इस्रायलवर हल्ला करणार असे म्हटले जात होते. हेजबोलाने गेल्या शनिवारी इस्रायलवर 50 रॉकेट हल्ले केले होते, परंतू इस्रायलच्या आयरन डोम क्षेपणास्र संरक्षण प्रणालीने हे हल्ले नाकाम ठरविले. इराण आणि हेजबोलात मध्य पूर्वेत मोठे युद्ध होणार असे म्हटले जात असताना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सद्य परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आपात्कालिन बैठक बोलावली होती. पेंटागनने यापुढील परिस्थिती पाहून या क्षेत्रात अतिरिक्त सैन्यदल तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.