अमेरिकेमध्ये घुसून दहशतवाद्याचा गेम करण्याचा भारताचा प्लान USA ने उधळला?

काही महिन्यांपूर्वी कॅनडामध्ये एका भारतविरोधी दहशतवाद्याची हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे भारतीय एजंट्सचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला होता. दोन्ही देशांमध्ये संबंध यावरुन बिघडले होते. आता अमेरिकेतही भारतावर तसाच आरोप झालाय.

अमेरिकेमध्ये घुसून दहशतवाद्याचा गेम करण्याचा भारताचा प्लान USA ने उधळला?
India-America
Follow us
| Updated on: Nov 23, 2023 | 11:38 AM

नवी दिल्ली : कॅनडा पाठोपाठ आता अमेरिकेतही भारतावर तसाच आरोप झालाय. भारताने अमेरिकेत एका दहशतवाद्याला संपवण्याचा कारस्थान रचलं होतं, असा दावा एका वर्तमानपत्राने केला आहे. अमेरिकेने हा विषय भारताकडे उपस्थित केल्यानंतर भारताने त्यावर आश्चर्य आणि चिंता व्यक्त केली. भारतावर गुरपतवंत सिंह पन्नूला मारण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुरपतवंत सिंह पन्नू खलिस्तान समर्थक दहशतवादी आहे, तो सतत भारताविरोधात गरळ ओकत असतो. अमेरिकेने भारताकडे हा विषय मांडला. त्यावर अशा प्रकरची कृती आमच्या धोरणाचा भाग नाही असं भारताकडून सांगण्यात आलं, असं ॲड्रिन वॅटसन म्हणाले. ते व्हाइट हाऊसचे प्रवक्ते आहेत. “भारत सरकार याची चौकशी करेल. पुढच्या काही दिवसात ते या बद्दल अधिक बोलतील. आम्ही आमच्या अपेक्षा त्यांना कळवल्या आहेत. जो कोणी यामागे आहे, त्याला जबाबदार धरलं पाहिजे” असं ॲड्रिन वॅटसन म्हणाले.

अमेरिकन सरकारने सर्वोच्च स्तरावर भारताकडे हा विषय उपस्थित केलाय. तितक्याच गांभीर्याने हा विषय हाताळला जाईल असं व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्याने सांगितलं. सुरक्षाविषयक चर्चेच्यावेळी अमेरिकेकडून भारताला या संदर्भात काही माहिती मिळाली. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूला अमेरिकन भूमीवर संपवण्याचा भारताचा कट अमेरिकेने उधळून लावला. ब्रिटनमधील फायनान्शिअल टाइम्स या वर्तमानपत्राने ही बातमी दिली होती. त्यानंतर यावर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

भारतविरोधी दहशतवाद्यांच्या मागे काळ लागला

गुरपतवंत सिंह पन्नू सिख फॉर जस्टिस संघटनेचा नेता आहे. त्याच्याकडे अमेरिका आणि कॅनडा दोन्ही देशांच नागरिकत्व आहे. भारताने सिख फॉर जस्टिसला दहशतवादी संघटना ठरवलं आहे. सध्या भारतविरोधी ज्यांनी कारवाया केल्या आहेत किंवा जे कारवाया करत आहेत, त्यांना वेचून-वेचून संपवलं जातय. अनेक दहशतवादी इथे गुन्हे करुन परदेशात लपून बसले आहेत. त्यांना शोधून-शोधून संपवलं जातय. यामागे कुठली तरी अज्ञात शक्ती आहे. पाकिस्तानात तर भारतविरोधी दहशतवाद्यांच्या मागे काळ लागला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.