AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आयसिस’लाही कोरोनाची धास्ती, युरोप दहशतवाद्यांच्या टार्गेटवरुन दूर

कुख्यात दहशतवादी संघटना आयसिसलादेखील कोरोना व्हायरसची धास्ती बसली आहे (ISIS on Corona Virus).

'आयसिस'लाही कोरोनाची धास्ती, युरोप दहशतवाद्यांच्या टार्गेटवरुन दूर
Follow us
| Updated on: Mar 15, 2020 | 12:10 PM

डमस्कस : कुख्यात दहशतवादी संघटना आयसिसलादेखील कोरोना व्हायरसची धास्ती बसली आहे (ISIS on Corona Virus). त्यामुळे आयसिसने आपल्या ‘अल नाबा’ हा साप्ताहिकात कोरोनापासून कसा बचाव करायचा, यासाठी काही सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांमध्ये ‘जेवणाअगोदर हात धुवावे, तोंड झाकावं आणि युरोपला जाणं टाळावं’, असा सल्ला देण्यात आला आहे (ISIS on Corona Virus).

“कोणताही आजार हा स्वत:हून नाही, तर अल्लाहच्या आदेशांवर येतात. अल्लाहवर विश्वास ठेवा. आजारी लोकांपासून दूर राहा”, अशा सूचना ‘अल नाबा’ या साप्ताहिकेत देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसिसकडून दहशतवाद्यांना युरोपपासून लांब राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे आयसिसकडून पुढचे काही दिवस युरोपमध्ये कोणत्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता कमी आहे.

आयसिस ही संघटना सिरीया आणि इराक या देशांमध्ये कार्यरत आहे. जगभरात आतापर्यंत 111 देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. मात्र, सिरीयामध्ये आतापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढलेला नाही. मात्र, इराकमध्ये आतापर्यंत 80 जण कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं आहे.

अमेरिकेने काही महिन्यांअगोदर आयसिसचा प्रमुख अबू बकर अल बगदादी याचा खात्मा केला होता. बगदादीच्या मृत्यूनंतर आयसिस संघटना कमकुवत झाली. आयसिस सध्या आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. त्यात आता कोरोनाच्या माहामारीचे सावट आहे. या महामारीपासून बचाव व्हावा यासाठी आयसिस प्रयत्न करत आहे.

संबंधित बातम्या :

Corona | महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी पाच रुग्ण, देशातील आकडा 100 च्या पार, पाक सीमा सील

CoronaVirus : रुग्णांचा कोरोनाशी यशस्वी लढा, भारतात उपचारानंतर 11 जण ठणठणीत बरे

इटलीत हनिमून, पतीला कोरोनाची लागण झाल्याचं समजताच पत्नीचा पोबारा

Corona virus | चीन, इराणसह 7 देशांचा प्रवास करुन आलेल्यांसाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या सूचना

CORONA : वधू-वरात तीन फूट अंतर, एकही नातेवाईक नको, पुण्यात सामूहिक विवाहासाठी ‘कोरोना’ अटी

Corona | मोदी सरकारचा मोठा निर्णय, कोरोनामुळे मृत्यू झाल्यास नातेवाईकांना 4 लाखांची मदत

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....