कोरोना व्हॅक्सीन धर्मसंकटात, मुस्लीम देशांकडून लसीला विरोध?, जाणून घ्या नेमकं कारण

कोरोना लसीला घेऊन नवा वाद निर्माण झाला आहे. लसीच्या निर्मिती प्रक्रियेला घेऊन इस्लामिक देशांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. (Islamic states Corona vaccine)

कोरोना व्हॅक्सीन धर्मसंकटात, मुस्लीम देशांकडून लसीला विरोध?, जाणून घ्या नेमकं कारण
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 11:20 PM

नवी दिल्ली : कोरोना संसर्गामुळे जगभरातील देश हैराण आहेत. तर ब्रिटन, अमेरिकासाऱख्या देशांमध्ये कोरोनाला थोपवण्यासाठी लसीकरण सुरु करण्यात आले आहे. भारतामध्येही सीरम, फायझर, भारत बायोटेकसारख्या कंपन्यांनी लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. मात्र, कोरोना लसीला (Corona vaccine) घेऊन नवा वाद निर्माण झाला आहे. लसीच्या निर्मिती प्रक्रियेला घेऊन इस्लामिक देशांनी (Islamic states) अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे अनेक कंपन्यांकडून तयार करण्यात येत असलेल्या कोरोना लसी धर्मसंकटकात सापडल्या आहेत. (Islamic states raise question on Corona vaccine production and storage method)

विरोधाचं कारण काय?

जगातील अनेक इस्लामिक देशांनी लसीकरणाला विरोध केला आहे. या देशांनी लसींवर गंभीर स्वरुपाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. या लसींच्या उत्पादन प्रक्रियेवर इस्लामिक देशांना आक्षेप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना लसीला स्टॅबेलाईज करण्यासाठी डुकरांपासून मिळणाऱ्या जिलेटीनचा उपयोग केला जातो. या जिलेटीनमुळे लसीची साठवणूक आणि वाहतूक प्रभावीपणे करता येते. तसेच लसीच्या सुरक्षिततेची क्षमताही वाढते. मात्र, वृत्तसंस्था असोशिएट प्रेस (AP) या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार इस्लामिक देशांनी याच कारणामुळे लसीकरणाला विरोध केला आहे. इस्लामनुसार डुकराच्या मासापासून तयार करण्यात आलेली कोणतीही वस्तू वर्ज्य आहे. या सर्व गोष्टींना हराम समजले जाते. त्यामुळे इस्लामिक लॉनुसार कोरोना प्रतिबंधक लसीदेखील हराम आहेत, असे इस्लामिक देशांचे मत आहे.

हा वाद कधीपासून

मुळात हा वाद ऑक्टोबर महिन्यापासून सुरु झाला. इंडोनेशियन अधिकारी आणि काही इस्लामिक धर्मगुरु कोरोना लसीवर चर्चा करण्यासाठी चीनला गेले होते. या भेटीदरम्यान लसीबाबत करार होणार होता. मात्र, चौकशीदरम्यान लस निर्मितीची पद्धती, जिलेटीनच्या वापराची माहिती मिळाली आणि इस्लामिक धर्मगुरुंनी कोरोना लसीवर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली.

फायझर, मॉडर्नाल, अ‌ॅस्ट्रेझेनेकाला द्यावे लागले स्पष्टीकरण

लसीकरणाचा हा वाद वाढल्यामुळे फायझर, मॉडर्ना, अ‌ॅस्ट्रेनेझेनेका या लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. या कंपन्यांनी कोरोना लस जिलेटीनवीना तयार करत असल्याचे सांगितले. अमेरिकन कंपनी फायझर मॉडर्ना आणि ब्रिटिश कंपनी अ‍ॅस्ट्रेझेनेका यांनी नोटीस प्रसिद्ध करुन त्यांनी तयार केलेल्या लसी वापरण्यास कुठलीही अडचण नसल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, डुकराच्या मासाचा वापर न केल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतरच कुठल्याही कंपन्यांना लसीकरणाची परवानगी देण्यात येईल अशी भूमिका इंडोनेशियाने घेतली आहे. तर इस्लामिक मेडिकल असोसिएशनचे महासचिव डॉ. सलमान वकार यांनी मुस्लीम देशांबरोबरच अनेक देशांना कोरोना लसीबद्दल आक्षेप असल्याचा दावा केला आहे. तसेच, सीडनी विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. हरनूर राशिद यांनी जिलेटीनचा उपयोग हा समान्य बाब असल्याचे सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

New Strain of Coronavirus : ब्रिटनच नाही तर ‘या’ देशांतही आढळली कोरोनाची नवी प्रजाती, भारताची स्थिती काय?

इमरान खान यांना 12 लाखांचा दंड, ‘या’ प्रकरणामुळं पंतप्रधानांनी भरले पैसे?

कोरोनाचा जीवघेणा अवतार आणि त्याची संपूर्ण माहिती, स्पेशल रिपोर्ट

(Islamic states raise question on Corona vaccine production and storage method)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.