AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel Hezbollah : पुढचे 72 तास महत्त्वाचे, इस्रायल कुठल्याही क्षणी आणखी एका देशाविरुद्ध पुकारु शकतो युद्ध

Israel Hezbollah : इस्रायल गाजामध्ये एक युद्ध लढतोय. पण इस्रायल कुठल्याही क्षणी आणखी एका देशाबरोबर युद्ध पुकारु शकतो. इस्रायलने त्याची सर्व तयारी पूर्ण केलीय. गाजा, राफामधून इस्रायल आपले सैनिक आता त्या देशाच्या सीमेवर तैनात करतोय. पुढचे 72 तास महत्त्वाचे आहेत.

Israel Hezbollah : पुढचे 72 तास महत्त्वाचे, इस्रायल कुठल्याही क्षणी आणखी एका देशाविरुद्ध पुकारु शकतो युद्ध
Representativ image Image Credit source: x
| Updated on: Jun 28, 2024 | 5:48 PM
Share

इस्रायलने लेबनानवर मोठा हल्ला करण्याची तयारी पूर्ण केलीय. इस्रायल आता आपल्या सैनिकांना गाजामधून लेबनान बॉर्डरवर तैनात करत आहे. इजिप्तच्या सिक्रेट एजन्सीच्या रिपोर्टमध्ये हा खुलासा झालाय. इस्रायल गाजामधून आपल्या सैनिकांना लेबनान बॉर्डवर हलवतोय. रिपोर्ट्नुसार पुढच्या 72 तासात इस्रायल राफामधील आपल्या सैनिकांना लेबनान बॉर्डरवर मूव करु शकतो. लेबनानची चिंता वाढली आहे.

इस्रायलच्या कुठल्याही हल्ल्याचा सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत असा हिजबुल्लाहने दावा केलाय. जर लेबनानवर हल्ला झाला, तर इस्रायलच्या कुठल्याही शहराला सोडणार नाही, असं लेबनानने म्हटलय. इराण समर्थित अन्य दहशतवादी गटांनी हिजबुल्लाहला युद्धात मदत करणार असं म्हटलय.

उत्तर सीमेवर तणाव वाढतोय

मागच्या आठ महिन्यांपासून लेबनान बॉर्डरवर हिजबुल्लाहने इस्रायलला त्रास दिलाय. लेबनान सीमेला लागून असलेल्या इस्रायली गावांमध्ये सध्या सतत हिजबुल्लाहचे रॉकेट येऊन पडतात. इस्रायलने अनेकदा प्रत्युत्तराची कारवाई करताना हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य केलय. मागच्या काही दिवसांपासून उत्तर सीमेवर तणाव वाढतोय. त्यानंतर इस्रायलने आपल्या रणनितीमध्ये बदल केलाय. गाजावरुन इस्रायलने आता लेबनान बॉर्डरकडे मोर्चा वळवला आहे.

24 तासात रिपोर्ट करण्याचे आदेश

इस्रायली सैन्याच्या तुकड्या गाजावरुन दुसऱ्या ठिकाणी जाण्याच्या तयारीत आहेत असं रिपोर्टमध्ये म्हटलय. इस्रायली सैन्य मोठ्या प्रमाणात आपले रणगाडे आणि सैन्य वाहनांना गाजामधून मागे घेत आहे. सैन्याच्या सर्व तुकड्यांना 24 तासात लेबनान बॉर्डरवर रिपोर्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

लेबनन बॉर्डरवर तणाव

इस्रायलने गाजावर हल्ले केल्यानंतर त्याला विरोध म्हणून हिजबुल्लाह लेबनान सीमेवर इस्रायलवर हल्ले करतोय. हिजबुल्लाह चीफ नसरल्लाहने म्हटलय की, गाजामध्ये सीजफायर होईपर्यंत हल्ले सुरु राहतील. हिजबुल्लाह चीफने मध्यस्थांना सांगितलं की, आमची मागणी स्पष्ट आहे, गाजामध्ये सीजफायर आणि पॅलेस्टाइन कैद्यांना सोडा. या शिवाय आम्ही हल्ले बंद करणार नाही.

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.