Israel-Hamas War | ….तेव्हाच इस्रायल देईल अंतिम ‘आक्रमणा’चा आदेश
Israel-Hamas War | शेकडो रणगाडे सीमेवर तयार, 13 दिवसानंतरही इस्रायल आक्रमणाचा आदेश का नाही देतय? फक्त एकाच घोषणाची प्रतिक्षा 'आक्रमण', इस्रायलचे शेकडो रणगाडे, सैनिक गाझा पट्टीत घुसण्यासाठी तयार आहेत.
जेरुसलेम : इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा आज 13 वा दिवस आहे. इस्रायली सैन्याकडून अजूनपर्यंत फक्त हवाई आक्रमण सुरु आहे. इस्रायली सैन्याने प्रत्यक्ष जमिनीवरील कारवाईला सुरुवात केलेली नाही. गाझा पट्टीजवळ दक्षिण इस्रायलच्या सीमेवर इस्रायली सैन्य, शेकडो रणगाडे गाझा पट्टीत घुसण्यासाठी तयार आहेत. फक्त इस्रायलच्या राजकीय नेतृत्वाकडून हिरवा कंदिल मिळण्याची प्रतिक्षा आहे. इस्रायली सैन्य एकदा गाझा पट्टीत घुसलं की, घनघोर लढाईला सुरुवात होईल. गाझा पट्टीत रस्ते अरुंद आहेत. छोट्या-छोट्या गल्लीबोळात इस्रायली सैन्याला लढाव लागेल. त्यांच्याकडे सर्व नकाशे, माहिती उपलब्ध असणार. इस्रायली सैन्य, रणगाडे आणि चिलखती वाहन सगळ सज्ज आहे. कुठल्याही क्षणी युद्धाची घोषणा होईल अशी स्थिती आहे.
इस्रायली सैन्य मागच्या काही दिवसांपासून सीमेवर आहे. पण अजून प्रत्यक्ष जमिनीवरच्या लढाईला का सुरुवात झाली नाही. असा काहीजणांच्या मनात प्रश्न असू शकतो. त्यामागे कारण असं आहे की, इस्रायलचे बंधक हमासच्या ताब्यात आहेत. त्यांना सोडवण्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरु आहेत. उद्या युद्धाला सुरुवात झाल्यानंतर कदाचित त्यांनी सुटका शक्य नसेल. म्हणून बंधकांची सुटका होईपर्यंत कदाचित हे युद्ध लांबवल जात असाव. तसंच गाझा पट्टी जितकी वर आहे, तितकीच खाली सुद्धा वसलेली आहे. म्हणजे हमासच्या दहशतवाद्यांनी जमिनीखाली बोगदे बनवले आहेत. या टनेलमध्ये हे दहशतवादी लपून बसले आहेत. तिथपर्यंत पोहोचण सोपं नाहीय. त्यात इस्रायली सैन्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात जिवीतहानी होऊ शकते. या सगळ्याच अभ्यास करुनच अंतिम आर-पारच्या लढाईचा निर्णय होऊ शकतो. तेव्हाच दिला जाईल अंतिम आक्रमणाचा आदेश
प्रत्यक्ष जमिनीवरच्या लढाईत इस्रायलला एकाचवेळी दोन ठिकाणी लढाव लागू शकतं. लेबनॉन सीमेवर हिजबोला सुद्धा आक्रमक झाली आहे. तिथे सुद्धा इस्रायली सैन्याला लढाव लागतय. अजून छोटी-मोठी लढाई चालूय. हेजबोलाकडून इस्रायली सैन्यावर हल्ले होतायत, त्याला इस्रायल प्रत्युत्तर देतय. लेबनॉनमध्ये ज्या ठिकाणाहून इस्रायलवर रॉकेट हल्ला झाला, ती ठिकाणी उद्धवस्त करण्यात आल्याची माहिती इस्रायली सैन्याने दिलीय. उद्या प्रत्यक्ष युद्धामध्ये इराण सुद्धा उतरु शकतो. अशास्थितीत एकाचवेळी इस्रायलला अनेक आघाड्यांवर लढाव लागेल. या सगळ्याचा अभ्यास करुनच इस्रायल अंतिम आक्रमणाचा आदेश देईल.