Israel Hamas War: चुन चुन के मारेंगे ! इस्राईलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचं खुलं आव्हान

हमासने एक-दोन नव्हे तर सात हजारहून अधिक रॉकेट इस्रायलवर डागले. इस्रायलमधील अनेक शहरांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यानंतर हमासचे प्रमुख दोहामध्ये आनंदोत्सव साजरा करताना दिसले. इस्राईलच्या पंतप्रधानांनी हमासला आव्हान दिले आहे. दहशतवाद्यांचा खात्मा केला जाईल असं त्यांनी म्हटले आहे.

Israel Hamas War: चुन चुन के मारेंगे ! इस्राईलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचं खुलं आव्हान
Follow us
| Updated on: Oct 08, 2023 | 9:05 PM

तेल अवीव : इस्त्रायली लष्कर आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. आतापर्यंत यामध्ये 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. इराणकडून हमासला थेट पाठिंबा मिळाला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासच्या तळांना उद्धस्त करण्याचा इशारा दिला आहे. हमास आणि इस्रायली लष्कर यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जगापुढे नवं संकट उभे राहिले आहे. लेबनॉनमधून इस्रायलच्या दिशेने अनेक तोफगोळे डागण्यात आले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायली सैन्याने तोफांचा मारा केलाय.

इस्रायलचे हमास नेत्यांच्या घरांवर हल्ले

इस्रायली सैन्याने गाझामधील हमासच्या प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरांवर हल्ला केला आहे. इस्रायली मीडियानुसार, याह्या सनवर, निझार अवदल्ला, फाथी हमद, इत्साम अल-डेलिस, कमाल अबू अवान आणि अबू मुआज सराज यांच्या घरांना लक्ष्य करण्यात आले.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) मध्ये इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षावर तातडीची बैठक झाली. UNSC चे 15 वर्तमान सदस्य रविवारी  न्यूयॉर्कमधील UN मुख्यालयात होणाऱ्या बैठकीला उपस्थित होते.

अनेक हमास दहशतवादी पकडले गेले

इस्रायलच्या दक्षिणेकडील भागात इस्रायली सुरक्षा दलांनी हमासच्या अज्ञात दहशतवाद्यांना पकडले किंवा ठार केले. गाझामधून घुसखोरी करणाऱ्या पॅलेस्टिनी दहशतवाद्यांचा शोध अजूनही सुरू असल्याचे इस्रायली माध्यमांनी सांगितले. किबुत्झ बेरी परिसरातील एका डायनिंग हॉलमध्ये ओलीस घेतलेल्या इस्रायली नागरिकांच्या गटाची सुटका करण्यात आली आहे. ज्या दोन दहशतवाद्यांनी त्याला पकडले होते ते ठार झाले आहेत.

इस्रायलवरील हल्ल्याला इराणचा पाठिंबा

हमासचे प्रवक्ते गाझी हमाद यांनी बीबीसीला सांगितले की, इराणने इस्रायलवर शनिवारी झालेल्या हल्ल्याला पाठिंबा दिला. या हल्ल्याला इराणचा थेट पाठिंबा होता.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.