Israel Hamas War | गाझात आता हॉस्पिटलवर बुलडोझर चालविणार इस्रायल, शस्रास्रे सापडल्याने घेतला निर्णय

गाझापट्टीतील अल शिफा हॉस्पिटलची झडती घेताना इस्रायलच्या सैन्याला तेथे दारुगोळा सापडल्याचा दावा इस्रायलने केला आहे. त्यामुळे या हॉस्पिटलच्या चारीबाजूंनी बुलडोझर आणि रणगाडे तैनात केले आहेत. दुसरीकडे पॅलेस्टाईनचे राजदूत अदनान अबू यांनी भारताकडून मदत मागितली आहे.

Israel Hamas War | गाझात आता हॉस्पिटलवर बुलडोझर चालविणार इस्रायल, शस्रास्रे सापडल्याने घेतला निर्णय
israel bulldozerImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 16, 2023 | 5:00 PM

जेरुसलेम | 16 नोव्हेंबर 2023 : हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर नृशंस हल्ला केल्यानंतर इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धाला महिना होऊन गेला आहे. या युद्धात 12 हजाराहून अधिक पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली सैन्याने गाझापट्टीत मैदानी लढाईला सुरुवात केली आहे. हमासच्या अतिरेक्यांच्या खात्मा करण्यास इस्रायलने सुरुवात केली आहे. उत्तर गाझापट्टीला बेचिराख केल्यानंतर इस्रायलने त्याच्यावर कब्जा केला आहे. आता इस्रायलच्या सैन्याने तेथील अल शिफा या मोठ्या हॉस्पिटलची झडती सुरु केली आहे. या हॉस्पिटलचा वापर हमासने आपले सेंटर म्हणून केल्याचा इस्रायलचा दावा आहे.

बुलडोझर चालविण्याची तयारी

गाझापट्टीतील अल शिफा हॉस्पिटलची झडती घेताना इस्रायलच्या सैन्याला तेथे दारुगोळा सापडला आहे. येथे मोठ्या प्रमाणात शस्रसाठा सापडल्याने आता या हॉस्पिटलवरच बुलडोझर चालविण्याची तयारी इस्रायलच्या सैन्याने केली आहे. या हॉस्पिटलच्या खालून भूयार असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.

रुग्णालयाच्या तळघरात कमांड सेंटर ?

हमासने कोणाला संशय येऊ नये म्हणून अल शिफा या सर्वात मोठ्या हॉस्पिटलच्या खाली भूयार खणून तेथे कमांड सेंटर उभारल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला आहे. अमेरिकेने देखील इस्रायलच्या या वृत्ताला दुजोरा दिला असून आपल्या गुप्तचर यंत्रणेचे देखील हेच म्हणणे असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे हमास या वृत्ताचे खंडन केले आहे.

दुसरीकडे इस्रायलने हॉस्पिटलच्या चारीबाजूंनी बुलडोझर तैनात केल्याचा आरोप पॅलेस्टाईनने केला आहे. हे धोकादायक असल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. युएनच्या ( संयुक्त राष्ट्र संघ ) म्हणण्यानूसार अजूनही या अल शिफा हॉस्पिटलमध्ये 2300 पेक्षा अधिक रुग्ण, कर्मचारी आणि विस्थापित नागरिक आहेत. ज्यात अनेक नवजात बालकांचाही समावेश आहे.

पॅलेस्टाईनची भारताला साद

इस्रायलच्या मोठ्या कारवाईनंतर आता पॅलेस्टाईनने भारताकडे मदत मागितली आहे. पॅलेस्टाईनने म्हटले आहे की भारत एक शक्तीशाली देश आहे. त्याने जर सांगितले तर इस्रायल भारताचे ऐकेल. भारतातील पॅलेस्टाईनचे राजदूत अदनान अबू यांनी म्हटले आहे की महात्मा गांधी यांच्यानंतर भारताने नेहमीच पॅलेस्टाईनच्या मुद्द्यास पाठिंबा देत या क्षेत्रात शांती स्थापित करण्यास सहकार्य केले आहे.

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.