Israel-Hamas War | युद्ध अजून भडकणार, पॅलेस्टाईनच्या पक्षात इतके देश एकत्र, इस्त्राईलविरोधात काढले फर्मान

Israel-Hamas War | हमासच्या आगळीकीमुळे इस्त्राईलने गाझा पट्टीत तीव्र हल्लाबोल केला आहे. गाझाची सर्वच बाजूंनी नाकाबंदी केली आहे. गाझातील अनेक इमारतींवर हल्ले करण्यात आले आहे. त्यामुळे अरब देशांनी पॅलेस्टाईनच्या बाजूने हुंकार भरला आहे. त्यांनी इस्त्राईलविरोधात एक फर्मान काढले आहे. त्यामुळे हे युद्ध भडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Israel-Hamas War | युद्ध अजून भडकणार, पॅलेस्टाईनच्या पक्षात इतके देश एकत्र, इस्त्राईलविरोधात काढले फर्मान
Follow us
| Updated on: Oct 12, 2023 | 9:30 AM

नवी दिल्ली | 12 ऑक्टोबर 2023 : हमास या दहशतवादी संघटनेने 6 ऑक्टोबर रोजी इस्त्राईलवर (Israel-Hamas War) अचानक हल्ला चढवला होता. चवताळलेल्या इस्त्राईलने प्रतिहल्ले वाढवले. त्यात गाझा पट्टीतील अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. या युद्धात दोन्ही बाजूची मोठी जीवितहानी आणि संपत्तीचे नुकसान झाले आहे. आता अरब राष्ट्रांनी या युद्धात दखल देण्यास सुरुवात केली आहे. 22 अरब राष्ट्रांनी (Arab Gulf Nations) इस्त्राईलविरोधात मोर्चा उघडला आहे. इस्त्राईलने गाझा पट्टीची नाकाबंदी केल्याने आखाती देशांनी इस्त्राईलची निंदा केली आहे. त्यांनी इस्त्राईलविरोधात हे फर्मान काढले आहे. त्यामुळे हे युद्ध लवकर संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.

इस्त्राईलचे हल्ले सुरुच

गाझा पट्टीचा संपूर्ण नाकाबंदी करण्यात आली आहे. वीज-पाणी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पॅलेस्टाईनच्या शहरात परिस्थिती बिघडली आहे. इस्त्राईलने क्षेपणास्त्र हल्ले वाढवले आहे. त्यामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहे. इस्त्राईलच्या एअरस्ट्राईकचा मोठा परिणाम दिसून येत आहे. यामध्ये महिला-मुलांना प्राण गमावावे लागले.

हे सुद्धा वाचा

गाझा पट्टीत मृत्यूचे तांडव

इजिप्तमधील काहिरा येथे अरब राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली. यामध्ये हमास-इस्त्राईल युद्धावर चर्चा झाली. या संघटनेने गाझा पट्टीची दमकोंडी थांबविण्याची मागणी केली आहे. या गरीब आणि दाट लोकवस्तीला तातडीने पायाभूत सुविधा पुरविण्याचे फर्मान सोडले आहे. इस्त्राईलच्या घेराबंदीविरोधात अरब राष्ट्रांनी आवाज उठवला आहे. इस्त्राईलच्या सातत्याने होणाऱ्या हल्ल्यामुळे गाझा पट्टीत मृत्यूचे तांडव सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. अरब लीगचे महासचिव अहमद अबुल घेईत यांनी इस्त्राईलवर डोळे वटारले आहेत.

पॅलेस्टाईनला स्वतंत्र देशाचा दर्जा देण्याची मागणी

अरब लीगमध्ये सौदी अरब, इजिप्त, इराक, जॉर्डन, कुवेत, लेबनॉन, लिबिया, मॉरिटानिया, मोरक्को, ओमान, पॅलेटस्टाईन, कतार, सोमालिया, सूडान, सिरिया, ट्यूनिशिया, संयुक्त अरब अमिरात, यमन, अल्जिरिया, बहरीन, कोमोरोस आणि जिबुती या राष्ट्रांचा समावेश आहे. त्यांनी पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा देण्याची विनंती केली आहे. 57 देशांच्या मुस्लीम संघटनेने पण हल्ल्याचा निषेद केला आहे. आता हे देश पॅलेस्टाईनच्या मागे उभे ठाकले आहे. त्यासाठी आर्थिक रसद पण पुरविण्यात येत आहे. त्यामुळे इस्त्राईल-हमासचे हे युद्ध लवकर संपण्याची चिन्हे नाहीत

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.