नेतान्याहू यांनी हमासच्या हल्ल्यास सिक्युरिटी फोर्सला जबाबदार धरले, टीका झाल्यानंतर डीलिट केले ट्वीट

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हल्ल्याबाबत कोणतीही गु्प्त सूचना मिळाली नाही अशी पोस्ट केली होती. मात्र जोरदार टीका झाल्यानंतर त्यांनी सोशल मिडीयावरील आपलीच पोस्ट डिलीट करुन टाकली आहे.

नेतान्याहू यांनी हमासच्या हल्ल्यास सिक्युरिटी फोर्सला जबाबदार धरले, टीका झाल्यानंतर डीलिट केले ट्वीट
pm netanyahuImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Oct 29, 2023 | 3:03 PM

तेलअवीव | 29 ऑक्टोबर 2023 : इस्रायल आणि हमास युद्धाचा 23 वा दिवस आहे. युद्धानंतर सर्व नेत्यांना, सरकारला आणि मला हमासच्या हल्ल्याबद्दल उत्तर द्यावे लागणार असल्याचे शनिवारी रात्री इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी म्हटले. 7 ऑक्टोबरच्या हमासच्या हल्ल्याची कोणतीही गुप्त माहिती मिळाली नसल्याने त्यांनी सिक्युरिटी फोर्स आणि गुप्तचर विभागाच्या प्रमुखांना जबाबदार ठरविले. मला कोणतीही पूर्व सूचना मिळाली नसल्याचे त्यांनी म्हटले. मात्र टीका झाल्यानंतर त्यांनी सोशल मिडीयातील ही पोस्ट डिलिट केली.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हल्ल्याबाबत कोणतीही गु्प्त सूचना मिळाली नाही अशी पोस्ट केली होती. इंटेलिजेंस टीम आणि शिन बेटाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे होते की हमास घाबरलेला आहे आणि सामंजस्य करण्याच्या तयारीत आहे. नेतान्याहू यांच्या या पोस्टवरून खूप टीका झाली. त्यानंतर त्यांनी ट्वीट डिलीट केले. शनिवारी इस्रायलने गाझावरील हमासच्या 450 अड्ड्यांना लक्ष्य केले. यात हमासचे कमांड सेंटर ऑब्जर्वेशन पोस्ट आणि एंटी टॅंक गायडेड मिसाईल लॉंच पोस्टचा समावेश होता.

युद्ध आता दुसऱ्या टप्प्यात

युद्धात आमचा हेतू एकदम स्वच्छ आहे. आम्ही हमास संपवून ओलिसांना परत आणणार. हमास हल्ल्यापासून वाचण्यासाठी सामान्य लोकांचा ढाल म्हणून वापर करीत आहे. आम्हाला मानवता आणि स्वत:च्या अस्तित्वाचं रक्षण करण्यासाठी हमासला मूळापासून नष्ट करावे लागेल असे इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी म्हटले आहे. इस्रायली डीफेन्स फोर्सने म्हटले आहे की ते हमासच्या अतिरेक्यांचे लोकेशन ट्रेस करून त्यांच्या अड्ड्यांना नष्ट करीत आहे. दुसरीकडे न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टच्या मते इस्रायली सैन्याने उत्तर गाझाला युद्धाचे मैदान म्हणून घोषीत करीत लोकांना गाझा सोडण्यास सांगितले आहे.

नेतान्याहूनी घेतली ओलीसांच्या कुटुंबियाची भेट

शनिवारी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी हमासने ताब्यात ठेवलेल्या नागरिकांच्या कुटुंबियाची भेट घेतली. हमासच्या कैदेत 229 ओलीस आहेत,त्यांचे नातेवाईकांनी खूप दिवसांपासून नेतान्याहू यांना भेटण्याची मागणी केली होती. इस्रायल भुयारांना लक्ष्य करीत आहे. या भूयारात ओलिसांना ठेवल्याचा संशय आहे. त्यांची सूटका केल्यानंतरच इस्रायल देखील त्यांच्या जेलमध्ये बंद असलेल्या पॅलेस्टाईन नागरिकांची सुटका करणार आहे.

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.