Israel-Hamas War Update | इस्रायल-हमासच्या घनघोर युद्धात सध्या काय अपडेट आहे?

Israel-Hamas War Update | काही ठराविक पॉइंट्समध्ये समजून घ्या इस्रायल-हमासच्या घनघोर युद्धाची स्थिती. इस्रायलने एकारात्रीत कहर केलाय. हमासने मोठी चूक केलीय. कारण इस्रायलच आतापर्यंतच सर्वात मोठं नुकसान झालय.

Israel-Hamas War Update | इस्रायल-हमासच्या घनघोर युद्धात सध्या काय अपडेट आहे?
Israel-Hamas War Update
Follow us
| Updated on: Oct 09, 2023 | 2:44 PM

जेरुसलेम : गाझापट्टीत घनघोर युद्ध सुरु आहे. हमासने शनिवारी इस्रायलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला. त्यानंतर इस्रायलने जबरदस्त प्रत्युत्तर दिलय. इस्रायलने गाझा पट्टीत घुसून हल्ले सुरु केले आहेत. हमासच्या हल्ल्यात इस्रायलच प्रचंड नुकसान झालय. हे आमच 9/11 त्यापेक्षाही मोठं आहे, असं इस्रायली संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने म्हटलय. त्यावरुन परिस्थितीची भीषणात लक्षात येते. इस्रायलने गाझा पट्टीत एकारात्रीत हमास आणि इस्लामिक जिहाद दहशतवादी गटाच्या 500 ठिकाणांना लक्ष्य केलय. इस्रायली एअर फोर्सच्या फायटर विमानांनी, हेलिकॉप्टर्सनी एअर स्ट्राइक केला. तोपगोळ्यांचा मारा करण्यात आला. एकात्रीत 500 ठिकाणांना टार्गेट करण्यात आलं. इस्रायली लष्कराने आपल्या स्टेटमेंटमध्ये हे म्हटलय.

इस्रायलच गाझा पट्टीत पॅलेस्टाइन बरोबर युद्ध दीर्घकाळ चालू शकतं. अशावेळी आर्थिक आघाडीवर स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी बँक ऑफ इस्रायलने ओपन मार्केटमध्ये 30 अब्ज डॉलरच्या परकीय चलनाची विक्री करण्याचा निर्णय जाहीर केलाय. दरम्यान इस्रायलमध्ये घुसलेले हमासचे दहशतवादी अजूनही बाहेर पडलेले नाहीत. गाझापट्टीत 7 ते 8 ठिकाणी लढाई सुरु आहे, असं इस्रायली लष्कराकडून सांगण्यात आलय. इस्रायली सैन्याने अजूनही त्यांच्या ताब्यातील भागावर पूर्णपणे नियंत्रण मिळवलेलं नाहीय. त्यासाठी इस्रायलचे प्रयत्न सुरु आहेत. युद्धाला सुरुवात झाल्यापासून गाझा पट्टीत 1,23000 नागरिक विस्थापित झाले आहेत. 73 हजार लोकांनी शाळेत आश्रय घेतलाय.

हा संघर्ष अजून तीव्र होणार

येणाऱ्या दिवसात हा संघर्ष अजून तीव्र होणार आहे. इस्रायलने मोठ्या लढाईसाठी तयार असल्याचे संकेत दिलेत. हेझबोल्लाह आणि इराण यामध्ये सहभागी होण्याची चूक करणार नाहीत, अशी अपेक्षा असल्याच इस्रायलने म्हटलं आहे. इस्रायलला पाठिंबा देण्यासाठी म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकन युद्ध नौका आणि फायटर विमान इस्रायलच्या जवळ तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. पूर्व भूमध्यसागरात ‘यूएसएस गेराल्ड आर फोर्ड’ या विमानवाहू युद्धनौकेसह अन्य वॉरशिप पाठवण्यात आल्या आहेत,

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.