Israel-Hamas War | दिल्लीतील एका घोषणेमुळे इस्रायल-हमास युद्ध, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा मोठा दावा

Israel-Hamas War | दिल्लीतील एका घोषणेमुळे इस्रायल-हमास युद्धाचा भडका उडालाय, असा मोठा दावा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केलाय. ही घोषणा काय आहे?. कुठल्या आधारावर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी हा दावा केलाय?. इस्रायल-हमास युद्धाशी भारताचा काय संबंध?

Israel-Hamas War | दिल्लीतील एका घोषणेमुळे इस्रायल-हमास युद्ध, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा मोठा दावा
Israel-Hamas War
Follow us
| Updated on: Oct 26, 2023 | 1:15 PM

नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास युद्धा दरम्यान अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी एक मोठ वक्तव्य केलय. या वक्तव्याने सगळेच चक्रावून गेलेत. ज्यो बायडेन यांनी या युद्धाशी भारताच नाव जोडलय. तुम्ही म्हणाल इस्रायल आणि हमास युद्धाशी भारताचा काय संबंध?. इस्रायल आणि पॅलेस्टाइनच्या सीमांशी दूरदूपर्यंत भारताचा संबंध नाहीय. मग इस्रायल-हमास युद्धाशी भारताचा काय संबंध?. अलीकडेच दिल्लीत G20 परिषद झाली. या परिषदेत एक घोषणा झाली. ही घोषणा सुद्धा इस्रायल-हमास युद्धामागे एक कारण आहे, असं ज्यो बायडेन यांनी म्हटलं आहे. दिल्लीत G20 परिषदेदरम्यान भारत-मिडिल ईस्ट-यूरोप आर्थिक कॉरिडोरची घोषणा झाली. हे सुद्धा हमासने इस्रायलवर हल्ला करण्यामागच एक कारण आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी दावा केला असला, तरी त्यांच्याकडे पुराव्याचा आधार नाहीय. बायडेन यांनी स्वत: सांगितलय, माझी जी समज आहे, त्या आधारावर मी हे मुल्यांकन केलय.

अमेरिकेत एका पत्रकार परिषदेत ज्यो बायडेन यांनी हा दावा केला. “हमासने इस्रायलवर जो हल्ला केला, त्यामागे भारत-मिडिल ईस्ट-यूरोप आर्थिक कॉरिडोर सुद्धा एक कारण असू शकतं. माझ्याकडे याचा कुठला पुरावा नाहीय. पण माझा आतला आवाज मला सांगतोय, इस्रायल क्षेत्राच्या एकीकरणासाठी आम्ही काम करतोय हे सुद्धा हल्ल्यामागच एक कारण असू शकतं” दिल्लीत आयोजित G20 परिषदेत नव्या आर्थिक कॉरिडोरची घोषणा झाली. या कॉरिडोरची घोषणा भारत, अमेरिका, सौदी अरेबिया, UAE, फ्रान्स, जर्मनी यांनी संयुक्तपणे केली. चीनच्या बेल्ट अँड रोडला विकल्प म्हणून या घोषणेकडे पाहिल जात होतं. या कॉरिडोरच्या माध्यमातून खाडी देशांसोबतही आपण जोडले जाणार आहोत. युरोपही जोडलं जाईल. बायडेन काय म्हणाले?

“मागच्या काही आठवड्यात मी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला, इजिप्तचे राष्ट्रपती सिसी, पॅलेस्टाइनचे राष्ट्रपती अब्बास आणि सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिन्ससोबत कॉरिडोरबद्दल चर्चा केलीय” असं बायडेन म्हणाले. “इस्रायलच्या उज्वल भविष्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. भविष्याच्या या योजनेत पॅलेस्टाइनच्या लोकांच्या इच्छा, आकांक्षा लक्षात घेतल्या जातील” असं बायडेन म्हणाले.

'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....