इस्राईलमध्ये धार्मिक उत्सवादरम्यान दुर्घटना, अनेक लोकांचा मृ्त्यू, वाचा नेमकी घटना काय…?
इस्राईलमध्ये ((Israel ) धार्मिक उत्सवाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास 12 ते 15 लोकांचा मृत्यू झालाय. देशातील नॅशनल इमरजन्सी सर्व्हिस 'मॅगन डेव्हिड एडम' (MDA) ने दुर्घटनेला दुजोरा दिला आहे. (Israel Stampede Dozen Killed lag Bomer Religious Festival)
नवी दिल्ली : इस्राईलमध्ये (Israel) धार्मिक उत्सवाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास 12 ते 15 लोकांचा मृत्यू झालाय. देशातील नॅशनल इमरजन्सी सर्व्हिस ‘मॅगन डेव्हिड एडम’ (MDA) ने दुर्घटनेला दुजोरा दिला आहे. परंतु या दुर्घटनेत नक्की किती लोकांचा जीव गेलाय, याचा आकडा त्यांनी सांगितलेला नाही. इस्राईलच्या ईशान्य भागात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक लोक जखमीही झाले आहेत. या चेंगराचेंगरीत 38 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी ‘हारेत्झ’ वृत्तपत्राने दिली आहे. सध्या आपत्कालीन सेवा घटनास्थळावरून जखमींना बाहेर काढण्यात व्यस्त आहे. (Israel Stampede Dozen Killed lag Bomer Religious Festival)
नेमकी काय घटना घडली..?
अगदी सुरुवातीला आलेल्या रिपोर्टनुसार, घटनास्थळावरील एक भाग (माची) कोसळला. खूप गर्दी झाल्याने हा भाग कोसळल्याचं एमडीएच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पोलिस सूत्रांनी हारेत्झ वृत्तपत्राला सांगितले की, ‘काही भाविक सीडीच्या पायऱ्या चढत असताना खाली सटकले त्यामुळे लोक खाली पडून चेंगराचेंगरी झाली.’
कोरोना व्हायरसच्या प्रकोपानंतर माउंट मेरॉनवर आयोजित लाग बी ओमर हा मोठा उत्सव होता. विषाणूचा धोका असूनही, हजारो लोक या उत्सवात सहभागी होण्यासाठी देशभरातून मेरॉन येथे आले होते. याच उत्सवादरम्यान चेंगराचेंगरी झाली.
जखमींची प्रकृती नाजूक: अधिकारी
चेंगराचेंगरीची माहिती मिळताच डझनभर रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवेतली वाहने घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी जमिनीवर पडलेले मृतदेह उचलून वाहनात टाकले आणि रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्व लोकांना तिथून जाण्यास सांगितलं. चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या 38 लोकांची प्रकृती चिंताजनक आहे, असं आपत्कालीन सेवेतल्या अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे.
पंतप्रधानांकडून दुख व्यक्त
घडलेली घटना अतिशय दु:खद असून मी मृत आणि जखमी व्यक्तींसाठी प्रार्थना करतो, असं ट्विट पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केलं आहे.
लाग बी’ओमर उत्सव काय असतो…?
दरवर्षी हजारो ऑर्थोडॉक्स समूहाचे लोक ज्यू ला ओमर उत्सवासाठी माऊंट मेरॉनमध्ये येतात. हा सण अग्नी प्रज्वलित करुन साजरा केला जातो आणि या आगीच्या आजूबाजूने लोक प्रार्थना करतात.
(Israel Stampede Dozen Killed lag Bomer Religious Festival)
हे ही वाचा :
‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार्स, मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट पर्याय