अरुणाचल पेक्षा क्षेत्रफळाने छोटा देश, 90 लाख लोकसंख्या तरी इस्रायल एवढा ताकतवान कसा

इस्रायलच्या मदतीला अमेरिकेसह जगातील अनेक देश धावून आले आहेत. केवळ 90 लाख लोकसंख्या आणि 8 मुस्लीम देशांनी घेरलेल्या इस्रायलकडे इतकी ताकद कशी ? इस्रायलची ताकद नेमकी कशात आहे ते पाहा...

अरुणाचल पेक्षा क्षेत्रफळाने छोटा देश, 90 लाख लोकसंख्या तरी इस्रायल एवढा ताकतवान कसा
ISRAELImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Oct 20, 2023 | 3:14 PM

नवी दिल्ली | 20 ऑक्टोबर 2023 : इस्रायल आणि हमास ( Israel-Hamas War ) युद्धामुळे इस्रायल चर्चेत आला आहे. हमास या पॅलेस्टिनी अतिरेकी संघटनेने इस्रायलवर 7 ऑक्टोबर रोजी अचानक रॉकेट हल्ले करुन जगात खळबळ उडवून दिली. त्यानंतर इस्रायलने गाझापट्टीवर बॉम्बहल्ले करीत अख्खी गाझापट्टी भाजून काढली आहे. अनेक इमारती बेचिराख झाल्या आहेत, जागोजागी मृत्यूचे अक्षरश: तांडव सुरु आहे. इस्रायलने हमासला संपविण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे हे युद्ध चांगलेच लांबणार आहे. त्याचा जगावर देखील परिणाम होणार आहे. त्यामुळे इस्रायलबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे.

इस्रायलने हमासचे नामोनिशान मिटवायचे असून त्यासाठी गाझापट्टीत केव्हाही मैदानी लढाई सुरु होऊ शकते असे म्हटले जाते. इस्रायलच्या मदतीला अमेरिकेसह जगातील अनेक देश धावून आले आहेत. केवळ 90 लाख लोकसंख्या आणि 8 मुस्लीम देशांनी घेरलेल्या इस्रायलकडे इतकी ताकद कशी काय असे कुतूहल सर्वसामान्यांना आहे. तर इस्रायलकडे एक किंमती खजाना आहे. त्यामुळे सारे जग त्यांच्या पुढे झुकत आहे. हा खजाना इस्रायलला आर्थिक रुपात मजबूत करीत आहे.

इस्रायलची अर्थव्यवस्था मजबूत

इस्रायल क्षेत्रफळात आपल्या मणिपूर राज्याहूनही छोटा आहे. तरीही जगातील ताकदवान देशांपैकी एक देश म्हणून त्याची गणना केली जाते. मजबूत इकॉनॉमी आणि आर्थिक स्थिती खंबीर असल्याने हे शक्य झाले आहे. इस्रायलची अर्थव्यवस्था 537 अब्ज डॉलरची आहे. इस्रायलची प्रति व्यक्ती जीडीपी म्हणजे दरडोई उत्पन्न 58,270 डॉलर आहे. भारताचे दरडोई वार्षिक उत्पन्न 2601 डॉलर इतके आहे. तर अमेरिकेचे दरडोई वार्षिक उत्पन्न 80,035 इतके आहे.

हिऱ्यांच्या निर्यातीत पुढे

इस्रायलचे जगातील मोठ्या देशांशी व्यापारी संबंध आहे. त्यांचा व्यापार भारत, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्सशी होतो. ज्या निर्यातीमुळे इस्रायल अर्थव्यवस्थेला गती मिळते त्यात हिऱ्यांची निर्यातीचा मोठा हात आहे. हिऱ्यांच्या निर्यातीमुळे इस्रायलला खूप पैसा मिळतो. इस्रायलच्या एकूण निर्यातीत 25 टक्के हिऱ्यांचा वाटा आहे. पॉलिश केलेल्या हिऱ्यांच्या सर्वात मोठ्या निर्यातदारापैकी इस्रायल एक आहे. तसेच कच्च्या हिऱ्यांचीही येथून निर्यात होते. जगातील हिऱ्याच्या उत्पन्नापैकी एक तृतीयांश हिरे दरवर्षी इस्रायल निर्यात करतो. साल 2020 मध्ये इस्रायलने 7.5 अब्ज डॉलर हिऱ्यांची निर्यात केली होती. इस्रायल हा जगातील सहावा सर्वात मोठा डायमंड एक्सपोर्टर असून हा व्यापार वाढतच आहे. 2022 मध्ये 9.06 अब्ज डॉलर पॉलिश्ड हिरे इस्रायलने जगभर निर्यात केले आहेत. इंटीग्रेटेड सक्रीटचे निर्यात 5.09 अब्ज डॉलर, रिफाइंड पेट्रोलियम 2.73 अब्ज डॉलर, मेडीकल उपकरणे 2.36 अब्ज डॉलर आणि अन्य उपकरणे 2.32 अब्ज डॉलर केली आहे. भारताला इस्रायल मोती-रत्ने, रासायनिक, खनिज, मशिनरी-विद्युत उपकरण, पेट्रोलियम तेल, संरक्षण, मशिनरी आणि परिवहन उपकरणे आयात करतो.

'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा.
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.