Israel-Hamas War | ‘हे घ्या पुरावे, इस्त्राईलच हमासला पुरवत आहे पैसा’, जगभरात उडाली खळबळ

Israel-Hamas War | इस्त्राईल आणि हमास एकमेकांविरोधात रणांगणात भिडलेले आहे. ते जागतिक मंचावर पण एकमेकांवर तिखट प्रतिक्रिया देत आहेत. पण याच दरम्यान या दोन्हीवर आरोपांचा बॉम्ब पडला आहे. इस्त्राईलच हमासला पैसा पुरवत असल्याचा गंभीर आरोप या देशाच्या गुप्तहेर संघटनेने केला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या एका बातमीने पण त्याला दुजोरा मिळाला आहे. 

Israel-Hamas War | 'हे घ्या पुरावे, इस्त्राईलच हमासला पुरवत आहे पैसा', जगभरात उडाली खळबळ
Follow us
| Updated on: Oct 20, 2023 | 4:52 PM

नवी दिल्ली | 20 ऑक्टोबर 2023 : इस्त्राईल आणि हमास यामधील युद्धाला दोन आठवडे झाले आहेत. दोन्ही बाजूने एकमेकांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. कडवी झुंज सुरु असतानाच आता या दोघांवर आरोपांचा बॉम्ब पडला आहे. इस्त्राईलच कतार या देशामार्फत हमासला पैसा पुरवत असल्याचा आरोप आखातातील या देशाने केला आहे. या देशाच्या गुप्तहेर संघटनेच्या प्रमुखाने केलेल्या या आरोपांनी जगात खळबळ उडाली आहे. त्यामुळे या युद्धावर पण प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पॅलेस्टाईनमध्येच नाही तर मध्य-पूर्वेत हमासचे महत्व वाढविण्यासाठी आणि इस्त्राईलला अधिक जमीन गिळंकृत करण्यासाठी तर हा खटाटोप सुरु नाही ना, अशी शंका अनेक देशांना येत आहे.

कोणी केला आरोप

सौदी अरबच्या गुप्तहेर संघटनेचे प्रमुख प्रिन्स तुर्की अल-फैसल यांनी हा गंभीर आरोप केला आहे. कतार या देशामार्फत इस्त्राईल हमास या दहशतवादी संघटनेला निधी पुरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. यापूर्वी रॉयटर्स या जागतिक वृत्त संस्थेने पण गाझा पट्ट्यात कतार मार्फत इस्त्राईल मार्फत निधी मिळत असल्याचे वृत्त दिले होते. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने इस्त्राईल हा निधी कतारला पोहचवतो. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेचे अधिकारी हा निधी गाझा पट्टीत पोहचवत असल्याचा आरोप सौदी अरबने केला आहे. त्याविषयीचे पुराव्यांचा पण दावा करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

प्रमुखांची कडक भूमिका

सौदी अरबच्या गुप्तहेर संघटनेच्या प्रमुखांनी इस्त्राईल आणि हमासची या युद्धासाठी निंदा केली आहे. त्यांनी पश्चिमी देशांवर पण टीका केली आहे. तर पॅलेस्टाईन नागरिकांच्या मृत्यूवर शौक व्यक्त करण्यास त्यांनी नकार दिला. गुप्तहेर संघटनेच्या प्रमुखांच्या या कडक भूमिकेने आखाती देशात पण वेगळा संदेश दिला आहे. एकूणच या युद्धावर प्रश्नचिन्हं उभं ठाकले आहे.

हमास-इस्त्राईलवर टीका

राईस विद्यापीठातील बेकर इन्स्टिट्यूट फॉर पब्लिक पॉलिसीवर प्रिन्स तुर्की अल-फैसल यांनी विचार मांडले. त्यांच्या मते, इस्त्राईलकडे सैन्य ताकद अधिक आहे. हमासने अगोदर केलेल्या हल्याचा त्यांनी निषेध केला. तर सध्या गाझात इस्त्राईलकडून सुरु असलेल्या हल्ल्यावर पण त्यांनी टीका केली आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.