Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युक्रेनमधील विद्यार्थ्यांपेक्षा मोदींना देशातील निवडणूका महत्त्वाच्या, जयंत पाटलांनी करून दिली त्या ट्विटची आठवण

शिक्षणासाठी भारतातून युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांना भारतात सुखरुप परत आणा असे पंतप्रधानांना (pm narendra modi) ट्वीट करुन सांगितले होते. परंतु त्यांना उत्तरप्रदेश आणि इतर निवडणूकांपेक्षा या देशात काहीच महत्वाचे वाटत नाही. असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी लगावला आहे.

युक्रेनमधील विद्यार्थ्यांपेक्षा मोदींना देशातील निवडणूका महत्त्वाच्या, जयंत पाटलांनी करून दिली त्या ट्विटची आठवण
जयंत पाटील
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 4:30 PM

मुंबई : रशिया आणि युक्रेनच्या (Russia ukraine Crisis) युद्धाने सध्या जगात खळबळ माजवली आहे. युक्रेनमध्ये अनेक भारतीय अडकले आहेत. त्यांना सुखरूप परत आणण्याची प्रयत्न सुरू आहे. त्याच पार्श्वभूमिवर राष्ट्रवादीने पुन्हा भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. शिक्षणासाठी भारतातून युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांना भारतात सुखरुप परत आणा असे पंतप्रधानांना (pm narendra modi) ट्वीट करुन सांगितले होते. परंतु त्यांना उत्तरप्रदेश आणि इतर निवडणूकांपेक्षा या देशात काहीच महत्वाचे वाटत नाही. असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी लगावला आहे. माध्यमांनी युक्रेनमध्ये युध्द सुरू झाले असून भारतातील विद्यार्थी अडकले असल्याचे विचारले असता जयंत पाटील यांनी केलेल्या ट्वीटची आठवण करून दिली. सध्या पाच राज्यातल्या निवडणुका गाजत आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष तिथे जोर लावताना दिसून येत आहे.

जयंत पाटलांचा आरोप काय?

ज्यावेळी निवडणूका देशात सुरू होतात त्यावेळी केंद्रसरकारमध्ये काम करणाऱ्या लोकांना कशातच रस नसतो असा अनुभव आहे. असा आरोपही जयंत पाटील यांनी केला. युक्रेन मध्ये आपले विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर परत आणा असे आठ दिवसापूर्वी केंद्रसरकारच्या प्रमुखांचे लक्ष ट्वीटच्या माध्यमातून वेधले होते. परंतु कोणतीच कार्यवाही झाली नाही असेही जयंत पाटील म्हणाले. युक्रेन मध्ये कालपासून युध्द सुरू झाले आहे. या संकटात विद्यार्थी सापडले आहेत. मी ट्वीट करुन मागणी केली त्याचवेळी प्रयत्न केला असता तर आज विद्यार्थी सुरक्षित राहिले असते. आज ते असुरक्षित आहेत. याची नोंद अगोदरच घ्यायला हवी होती परंतु केंद्रसरकारने घेतली नाही आतातरी नोंद घेतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

मोदींची फोनवरून चर्चा

भारतासह अनेक देशातील विद्यार्थी आणि नागरिक या दोन्ही देशात अडकून पडले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. तसेच पुतीन यांनी मोदींना युक्रेनवर हल्ला का करावा लागला याची माहिती देतानाच सध्याची परिस्थितीही अवगत केली आहे. तर मोदींनी चर्चा आणि शांततेने मार्ग काढण्याचं आवाहन मोदींनी पुतीन यांना केलं आहे. तसेच रशिया आणि नाटोमधील मतभेद प्रामाणिकपणे चर्चेने सोडवण्याचा सल्लाही मोदींनी दिला आहे. त्यामुळे पुतीन काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Fact check : Russia Ukraine युद्धादरम्यान Fake photo आणि Videosचं फुटलं पेव! जाणून घ्या सत्य

रशियाने घेतला चेर्नोबिलचा ताबा,1986 सालच्या अणुऊर्जा अपघाताची आठवण, नेमकं काय घडलं ज्यामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला

Russia Ukraine War: रशिया-युक्रेनमध्ये युद्धाचा भडका, पुतीन-मोदींची फोनवर चर्चा; मोदी म्हणाले, चर्चेतूनच प्रश्न सुटेल

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.