AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

३० कोटींचा तगडा पगार, काम केवळ स्विच ऑन-ऑफ करणे, तरीही कोणी नोकरी करायला तयार नाही

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.  या लाईटहाऊसमध्ये एक रात्र घालविले देखील अवघड आहे. येथे काम करण्यासाठी ३० कोटी रुपयांचा पगार आणि आलीशान लाईफ स्टाईलची ऑफर दिली जात आहे.

३० कोटींचा तगडा पगार, काम केवळ स्विच ऑन-ऑफ करणे, तरीही कोणी नोकरी करायला तयार नाही
| Updated on: Feb 25, 2025 | 10:31 PM
Share

जर तुम्हाला केवळ एका जागी राहून ३० कोटी रुपयांचा पगार कोणी देत असेल तर तुम्ही म्हणाल काय मस्करी करता राव, कोणी एका ठिकाणी राहायचे इतके वेतन देईल काय ?  जगात काही रहस्यमय ठिकाणांचे रहस्य आज देखील कायम आहे. आज आपण या जागेसंदर्भात वाचणार आहोत तेथे नोकरी करणाऱ्याला केवळी स्विच ऑन आणि ऑफ करायचे तीस कोटी दिले जातात…. ही जागा एक लाईटहाऊस आहे.  हे काही साधारण लाईट हाऊस नाही. हे लाईट हाऊस वास्तू कलेचा उत्तम नमूना आहे. ज्यांना रोमान्स आणि साहसपूर्ण जीवन पसंद आहे. त्यांच्यासाठी हे ठिकाण स्वर्गाहून कमी नाही. परंतू येथे पोहचणे फार कमी लोकांना शक्य असते. अखेर इतका पगार आणि सोयी सुविधा असतानाही ही जगातील सर्वात कठीण नोकरी मानली जाते. चला तर पाहूयात काय आहे ही बातमी …

या जागेचा इतिहास काय आहे?

प्रसिद्ध नौदल कॅप्टन मॉरिशियस यांना एकदा इजिप्तच्या के अलेक्जेंड्रिया जवळ भयंकर वादळाचा सामना करावा लागतो. या ठिकाणी मोठ्या खडकांमुळे मॉरिशसच्या जहाजाचे मोठे नुकसान होते.या अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाल्यानंतर या ठिकाणी जहाजांसाठी ‘लाईट हाऊस‘ उभारण्याची गरज आहे हे स्पष्ट होत. तत्कालिन सरकारने एका प्रसिद्ध वास्तूकारांना बोलवते आणि समुद्रामध्ये या लाईट हाऊस उभारण्याचे सांगते.या खडकांपासून जहाजाचा बचाव करण्यासाठी येथे लाईट हाऊस उभारण्यात येते.

खास व्यवस्था

इजिप्तच्या के.अलेक्झाड्रीयात फरोस बेटावर या द्वीपसमुहाची उभारणी होते. या द्वीप समुहाला ‘द फरोस ऑफ अलेक्झाड्रिया’ नावाने ओळखले जाते. या लाईट हाऊसला वास्तूकलेचा उत्तम नमुना मानला जातो.या लाईट हाऊसमध्ये एवढी मोठी आग जाळली जाते त्याचा प्रकाश लांबूनही दिसते. हा प्रकाश विशेष लेन्सच्या मदतीने आणखी दूरवरुन दिसतो.

सात आश्चर्यापैकी एक

जहाज रस्ता चुकु नये म्हणून लाईटहाऊसचा वापर व्हायचा, आधी हे समुद्राच्या किनाऱ्यावर बांधले जात होते. आता समुद्राच्या आत देखील उभारतात. तेथे पाणी उथळ असते. खडक देखील जास्त असतात. वीजेच्या शोधानंतर या लाईट हाऊसमध्ये विजेचे बल्ब लावले जातात. त्यामुळे याची कार्यक्षमता वाढली.लाईट हाऊसच्या काळजी घेणाऱ्या व्यक्तीला या लाईट हाऊसला नेहमीच प्रज्वलित केले पाहीजे. हा लाईट हाऊस एवढ्या कठीण जागी उभारलेले आहे. येथे जाऊन याची निर्मिती 284-246 इसवी सना पूर्वी केली. आज देखील या जागेला आव्हानात्मक मानले जाते. आजही येथे पोहचणे अवघड आहे. यामुळे प्राचीन काळात याला जगातील सात आश्चर्यापैकी एक मानले जात होते.

नोकरीत काय काम करायचे ?

या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीला या कठीण क्षेत्रात राहावे लागते. या दीपगृहाला अनेकदा तीव्र वादळांचा तडाखा बसतो. हे लाईट हाऊस नेहमी प्रज्वलित ठेवावे लागत आहे. या भागात समुद्राच्या प्रचंड लाटा येत राहतात, ज्या सतत या दीपगृहावर आदळतात. कधीकधी, हे दीपगृह अर्ध्याहून अधिक पाण्यात बुडालेले असते. त्यामुळे या कठीण प्रसंगात तग धरण्यासाठी येथील नोकरी करणाऱ्या ३० कोटी रुपयांचे वेतन दिले जात आहे. परंतू इतक्या प्रतिकूल परिसरात एकटे रहावे लागत असल्याने ही नोकरी ३० कोटी रुपये पगार देऊनही नोकरी करायला कोणी तयार नाही.

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.