डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ धोरणावर जो बायडन यांचा यूटर्न म्हणाले…

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांनी स्थलांतरितांच्या मुद्द्यावरुन यूटर्न घेतला आहे. (Joe Biden Immigration Policy)

डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' धोरणावर जो बायडन यांचा यूटर्न म्हणाले...
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 2:47 PM

वॉशिंग्टन: अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांनी स्थलांतरितांच्या मुद्द्यावरुन यूटर्न घेतला आहे. बायडन यांनी प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या काळात स्थलांतर धोरणाबाबत घेतलेले निर्णय मागे घेण्याची घोषणा केली होती. बायडन यांनी स्थलांतर धोरण बदलण्यासाठी काही महिने लागतील असं सांगितलं आहे.(Joe Biden said it takes time to change immigration policies of Donald Trump)

जो बायडन यांचे परराष्ट्र धोरणविषयक सल्लागारांनी सोमवारी एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे. जो बायडन यांच्या देशांतर्गत धोरणांविषयीच्या सल्लागार सुसन राईस, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन आणि जो बायडन यांनी स्थलांतर धोरणात घाईनं बदल करणे अडचणी निर्माण करणारे ठरु शकते, असं सांगितले.

बायडन यांनी मेक्सिकोचे राष्ट्रपती आणि लॅटिन अमेरिकेतील इतर राष्ट्रांशी चर्चा केली असल्याचं सांगितलं आहे. स्थलांतराच्या मुद्यावरुन या मेक्सिको आणि इतर देशांशी चर्चा केल्यामुळे संबंध बिघडणार नसल्याचे सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने स्थलांतरित नागरिकांवर लावलेल्या प्रतिबंधातून सूट देण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे बायडन यांनी स्पष्ट केले आहे. (Joe Biden said it takes time to change immigration policies of Donald Trump)

20 जानेवारीला बायडन यांचा शपथविधी

अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी रिपब्लिकचे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. बायडन यांच्या अध्यक्षपदावर इलेक्ट्रोलच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालं आहे. जो बायडन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचा शपथविधी सोहळा कॅपिटल हिलसमोर होणार आहे. अमेरिकेत अध्यक्षांच्या शपथविधीचा सोहळा 20 जानेवारीला संपन्न होतो. या दिवसाला अध्यक्षांच्या कार्यकालाचा पहिला दिवस मानला जाते. अमेरिकेत ही परंपरा 1937 पासून सुरु आहे. यावर्षाच्या शपथविधी सोहळ्यावर कोरोना ससंर्गामुळे मर्यादा येणार आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नरेंद्र मोदींचा गौरव 

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाता जाता मोदी यांना Legion of Merit हा अमेरिकेतील सर्वोच्च सन्मान देऊन गौरवले आहे. अमेरिकेतील भारतीय राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी या पदकाचा स्वीकार केला. अमेरिकेने मोदींना हा सर्वोच्च पुरस्कार दिल्याने त्यांच्या निर्विवाद नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालं आहे.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी व्हाईट हाऊसमध्ये भारतीय राजदूत तरणजीत सिंग संधू यांच्याकडे हे पदक सोपवले. राष्ट्रपती ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेचे संबंध मजबूत करण्यावर भर दिल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना Legion of Merit हे पदक बहाल केलं आहे, असं ब्रायन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. Legion of Merit हा पुरस्कार अमेरिकेतील सर्वोच्च पुरस्कार आहे. चीफ कमांडर श्रेणीचा हा पुरस्कार असून तो केवळ एखाद्या देशाच्या सरकारला किंवा एखाद्या देशाच्या प्रमुखांनाच दिला जातो.

संबंधित बातम्या:

मोदींच्या नेतृत्वाचा अमेरिकेतही डंका; जाता जाता ट्रम्प यांच्याकडून सर्वोच्च गौरव

अमेरिकेत अध्यक्षांच्या निवडणुकीचा निकाल नोव्हेंबरमध्ये, शपथविधी 20 जानेवारीला, काय परंपरा?

(Joe Biden said it takes time to change immigration policies of Donald Trump)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.