पक्ष्यांचा थवा विमानाला धडकला आणि…, रशियाला जाणाऱ्या विमानाचा अपघात, 42 जणांचा मृत्यू
कझाकिस्तानमध्ये रशियाला जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात झाला. पक्ष्यांच्या थव्याने विमानाला धडक दिल्याने तांत्रिक बिघाड झाला आणि इमर्जन्सी लँडिंग करताना विमान कोसळले. यात 42 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 25 जण जखमी झाले. या विमान अपघाताचे थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कझाकिस्तान देशातून रशियाच्या दिशेला जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर विमानात लागलेल्या भीषण आगीमुळे तब्बल 42 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त विमान हे कझाकिस्तानच्या अझरबैजानमधूल बाकू येथून रशियाच्या चेचन्याची राजधानी असलेल्या ग्रोझनी येथे जात होते. या दरम्यान हवेत पक्षांचा थवा विमानाला थडकला. यामुळे विमानात तांत्रित बिघाड झाला. या तांत्रिक बिघाडामुळे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण इमर्जन्सी लँडिंग करत असताना विमान सारखं खालच्या आणि वरच्या दिशेला जात होते. अखेर लँडिंगवेळी विमान जमिनीला जोरात धडकलं आणि विमानाने जागच्या जागी घिरट्या घेतल्या. यामुळे विमानाचे सर्व भाग खिळखिळे झाले आणि मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे विमानाला भीषण आग लागली. या आगीत अनेक जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या विमान अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.
अपघातग्रस्त विमान हे अझरबैजान एअरलाईन्सचे आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 42 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 25 जण बचावले आहेत. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेचे व्हिडीओ समोर आल्यानंतर संपूर्ण जग हादरलं आहे.
BREAKING: Passenger plane crashes near Aktau Airport in Kazakhstan pic.twitter.com/M2DtYe6nZU
— BNO News (@BNONews) December 25, 2024
अपघातग्रस्त विमान हे ब्राझीलच्या एयरोस्पेस कंपनीने बनवलं होतं. हे विमान टेक ऑफ करताना कमीत कमी 51800 kg वजन घेऊन उडू शकतं. तसेच लँडिंगवेळी या प्लेनची क्षमता 44000 kg असते. असं असताना या विमानाचा अपघात झाला आहे. या अपघातानंतर आता अपघातामागील सखोल कारणं शोधली जात आहेत. सुरुवातीला खराब वातावरणाचंदेखील कारण सांगितलं जात होतं. या घटनेमुळे संपूर्ण जग सुन्न झालं आहे. विमान अपघाताचा व्हिडडीओ हा सुन्न करणारा आहे.
This video shows what happened in the minutes before the plane crash in Kazakhstan. The plane repeatedly went up and down before crashing. pic.twitter.com/dQ0H1c9R0R
— BNO News Live (@BNODesk) December 25, 2024
दरम्यान, या घटनेचे दोन व्हिडीओ जास्त व्हायरल होत आहेत. यापैकी पहिला व्हिडीओ हा विमान अपघाताचा आहे. विमान लँड करत असताना जमिनीवर कोसळतं आणि विमान खिळखिळं होतं. यानंतर मोठा स्फोट होतो. यावेळी मोठी आग लागते. हा व्हिडीओ अतिशय थरकाप उडवणारा आहे. तर दुसरा व्हिडीओ हा अपघाताचा एक मिनिट आधीचा आहे. या व्हिडीओत विमान हे हवेत वर-खाली होताना दिसत आहे. हे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.