किम जोंग यांचं अस्तित्व फक्त इतके दिवस; कोरियातून आला हुकूमशहाची झोप उडवणारा रिपोर्ट

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्या सत्तेला आतून नव्या धोक्याने आव्हान दिले जात आहे. दक्षिण कोरियाच्या संसदेच्या एका संशोधन अहवालानुसार, उत्तर कोरियाच्या संसदेचे प्रमुख चो र्योंग-ही एक अनधिकृत शक्तिशाली नेटवर्क तयार करत आहेत, जे देशाच्या राजकीय व्यवस्थेला आतून हादरवत आहे.

किम जोंग यांचं अस्तित्व फक्त इतके दिवस; कोरियातून आला हुकूमशहाची झोप उडवणारा रिपोर्ट
Kim jong un
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Apr 16, 2025 | 1:16 PM

उत्तर कोरियाचा उल्लेख होताच जगाच्या नजरा त्यांचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांच्यावर खिळल्या आहेत. तर कधी त्यांची शक्तिशाली बहीण किम यो-जोंगवर. पण खरंच किम घराणं उत्तर कोरियाच्या सत्तेची गुरुकिल्ली आहे का? नुकत्याच आलेल्या एका धक्कादायक अहवालामुळे हा समज डळमळीत झाला आहे.

किम जोंग उन यांच्या सावलीत आणखी एक व्यक्ती शांतपणे सत्तेचे साम्राज्य उभारत असल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या संसदेने केलेल्या संशोधनात करण्यात आला आहे. चो रियोंग असे या व्यक्तीचे नाव आहे.

किम यांच्या खुर्चीला आव्हान?

उत्तर कोरियाच्या संसदेचे, सुप्रीम पीपल्स असेंब्लीचे प्रमुख चो र्योंग-ही हे आता केवळ नाव राहिलेले नाही. अहवालानुसार, त्यांनी देशांतर्गत एक प्रभावी नेटवर्क तयार केले आहे, जे केवळ निर्णयांवर परिणाम करत नाही, तर सत्तेच्या पारंपरिक केंद्रालाही आव्हान देत आहे.

किम कुटुंबाचे जवळचे मानले जाणारे चो 2017 मध्ये ऑर्गनायझेशन अँड गाईडन्स डिपार्टमेंटचे (ओजीडी) संचालक झाले आणि तेव्हापासून ते किम यांच्यानंतरचे सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानले जातात. रिपोर्टनुसार, चो यांच्या जवळचे लोक पक्ष, लष्कर आणि सरकारमध्ये महत्त्वाच्या पदांवर पोहोचले आहेत.

चो यांचे जुने सहकारी री योंग गिल, नो क्वांग चोल आणि किम सू गिल आता लष्करातील उच्च पदांवर आहेत. त्याचबरबर कॅबिनेटचे प्रमुख पाक थी सोंग यांच्यासारखे नेतेही चो यांच्या नेटवर्कमुळे उदयास आले आहेत.

किम यांची बहीणही शर्यतीत नाही?

या वाढत्या शक्तीमुळे सर्वोच्च नेता व्यवस्थेतील आवश्यक समतोल बिघडत असल्याचे अहवालात म्हटले आहे. किम यांची बहीण किम यो जोंग यांनी यापूर्वी चो यांच्याशी स्पर्धा केली होती, त्यांनी आता सर्व औपचारिक पदांचा राजीनामा दिला आहे. किम यो जोंग यांनी चो यांच्या मुलाशी लग्न केल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला असला तरी त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सत्तेचा जुना खेळाडू जो योंग वोननेही दुहेरी पोझिशनच्या माध्यमातून स्वत:ला मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे, पण चोच्या वर्चस्वापुढे त्याची चमक ओसरली आहे.

किम यांच्यासाठी ‘ही’ धोक्याची घंटा

विशेष म्हणजे 2017 पासून किम जोंग उन यांच्याकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिक्षेत घट झाली असली, तरी किम आता सत्ता चालवण्यासाठी चो यांच्या शक्तीवर अवलंबून असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पण सत्तेतील हा असमतोल भविष्यात उत्तर कोरियासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.