फिलिपीन्समध्ये कुणालाही त्रास देणं बेकायदेशीर आहे. त्यामुळे चेष्टा केली आणि समोरच्याला ती आवडली नाही तर फिलिपीन्समध्ये थेट जेलची हवा खावी लागू शकते. येथील कायद्यानुसार, 'प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्याच्या प्रतिष्ठेचा, व्यक्तित्वाचा, गोपनीयतेचा, मन शांतीचा आणि खासगीपणाचा आदर करायला हवा (Philippines Illegal to Vex Someone). कुणाच्या खासगी आयुष्यात इतर कुणी ढवळा ढवळ करु नये. एखाद्या व्यक्तीचा त्याचा धर्म, आर्थिक परिस्थिती, जन्मस्थान, शारीरिक ठेवण किंवा इतर गोष्टींवरुन अपमान करता येत नाही.' जर असं झालं तर संबंधित व्यक्ती याविरोधात तक्रार करु शकते.