चीनचे अब्जाधीश जॅक माला 2 महिन्यात 80 हजार कोटींचं नुकसान, नेमकं काय झालं?

बीजिंग : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश असलेले चीनचे अब्जाधीश उद्योगपती जॅक मा यांच्यासाठी 2020 चे शेवटचे काही दिवस चांगलेच खराब ठरले आहेत. ऑक्टोबर 2020 च्या अखेरनंतर केवळ 2 महिन्यात जॅक मा यांना तब्बल 80 हजार कोटी रुपयांचा (11 अब्ज डॉलर) फटका बसलाय. यामुळे चीनसह जगभरात खळबळ माजली आहे. तसेच या मागील कारणं काय असा […]

चीनचे अब्जाधीश जॅक माला 2 महिन्यात 80 हजार कोटींचं नुकसान, नेमकं काय झालं?
Follow us
| Updated on: Jan 02, 2021 | 11:41 PM

बीजिंग : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश असलेले चीनचे अब्जाधीश उद्योगपती जॅक मा यांच्यासाठी 2020 चे शेवटचे काही दिवस चांगलेच खराब ठरले आहेत. ऑक्टोबर 2020 च्या अखेरनंतर केवळ 2 महिन्यात जॅक मा यांना तब्बल 80 हजार कोटी रुपयांचा (11 अब्ज डॉलर) फटका बसलाय. यामुळे चीनसह जगभरात खळबळ माजली आहे. तसेच या मागील कारणं काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय. याचं मुख्य कारण चीनच्या आर्थिक नियंत्रण संस्थांनी जॅक यांच्या कंपनीवर केलेली कारवाई हे आहे (Know all about how Chinese Businessman Jack Ma lose 80 thousand crore net worth).

अलीबाबा चीनच्या सर्वात मोठ्या कंपनींपैकी एक आहे. यावर्षी जॅक मा यांची संपत्ती 61.7 अब्ज डॉलरपर्यंत पोहचली आहे. ते पुन्हा एकदा चीनचे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनण्याच्या मार्गावर होते. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सने दिलेल्या माहितीनुसार, जॅक मा यांची नेट वर्थ घटून 50.9 अब्ज डॉलरवर आली आहे.

इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ

जॅक मा यांनी इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ (Initial public offering) सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र, चीन सरकारने जॅक यांच्या या महत्त्वकांक्षी प्रकल्पाची चौकशी सुरु केल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ होण्यास सुरुवात झाली. चीनच्या आर्थिक नियमन संस्थेने चॅक यांच्या ग्रुपो होर्मिगा कंपनीच्या आयपीओला स्थगिती देऊन चौकशी सुरु केली. यानंतर जॅक यांच्या नुकसानीस सुरुवात झाली.

विशेष म्हणजे नोव्हेंबर 2020 च्या सुरुवातीपर्यंत सर्वकाही सुरळीत सुरु होतं. जॅक इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ सुरु करणार होते. मात्र, त्याआधीच जॅक चीन सरकारच्या नजरेत आले आणि त्यांच्या अडचणींची मालिका सुरु झाली. इनवेस्टर्स ग्रुपो होर्मिगा सिक्युरिटीजच्या हॉन्गकॉन्ग आणि शांघाय स्टॉक एक्सचेंजवर येणाऱ्या आयपीओची खरेदी करण्यासाठी अनेकजण वाट पाहत होते. या आयपीओची किंमत जवळपास 34.4 अब्ज डॉलर होती. शेवटच्या क्षणी चीनच्या आर्थिक नियंत्रण संस्थेने काही प्रश्न उपस्थित केले आणि या आयपीओचं लाँचिंगही खोळंबलं.

काही जाणकारांच्या मते चीन सरकारची ही कारवाई बीजिंगमधील अँट ग्रुपसारख्या विशाल उद्योग समुहांवर आणि जॅक माच्या विकासावर लगाम लावण्याचा प्रकार आहे.

जॅक मा यांची सरकारवर टीका करणारी वक्तव्यं

चीनच्या घडामोडींवर लक्ष ठेऊन असलेल्या काही तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅक मा यांनी वारंवार चीन सरकारची अडचण करणारी वक्तव्यं केली आहेत. त्यामुळेच चीन सरकारने त्यांच्यावर अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने ही कारवाई सुरु केली. जॅक मा चीन सरकारला आव्हान वाटायला लागले होते. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई केली असावी, अशीही शक्यता व्यक्त केली जातेय.

जॅक यांनी चीनच्या सरकारी बँकांना सरकारच्या हातातील खेळणं म्हणत या बँकांकडे कोणतीही कल्पकता नसल्याची टीका केली होती. तेव्हा देखील जॅक अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या नजरेवर आले होते. तेव्हापासूनच ग्रुपो होर्मिगा कंपनीच्या अडचणीत वाढ होण्यास सुरुवात झाली.

हेही वाचा :

जॅक-माच्या अलीबाबा ग्रुपच्या अडचणीत वाढ, चीन सरकारचे चौकशीचे आदेश

दररोज नव्हे तर आठवड्यातून 12 तासच काम, ‘अलिबाबा’च्या श्रीमंतीचा नवा फंडा

Know all about how Chinese Businessman Jack Ma lose 80 thousand crore net worth

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.