Morocco Migration to Spain | मोरोक्कोतून स्पेनमध्ये मोठं स्थलांतर, नेमकं कारण काय?

मोरोक्को-स्पेन सीमेवर चिमुकल्यांना खांद्यावर घेत शेकडो मैलांचा प्रवास करत मोरोक्कोचे नागरिक स्पेनमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत आहेत.

Morocco Migration to Spain | मोरोक्कोतून स्पेनमध्ये मोठं स्थलांतर, नेमकं कारण काय?
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 5:04 PM

क्वेटो : सध्या जगातील इतर भागात घडत असलेल्या काही घटनांनी संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलंय. यात पहिल्या क्रमांकावर इस्राईल-हमास युद्ध आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर आता मोरोक्को-स्पेन सीमेवर आलेल्या स्थलांतरीत लोंढ्यांचा विषय आहे. मोरोक्को-स्पेन सीमेवर चिमुकल्यांना खांद्यावर घेत शेकडो मैलांचा प्रवास करत मोरोक्कोचे नागरिक स्पेनमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत आहेत. हजारो प्रवासी पाणी, जमीनमार्गाने स्पेनच्या सीमेवर येत आहेत. या स्थलांतरामुळे मोरोक्को-स्पेन सीमेला छावणीचं रुप आलंय. मोरोक्कोचे नागरिक चिमुकल्यांना खांद्यावर घेत शेकडो मैलांचा प्रवास करत आहेत. समुद्राच्या लाटांवर स्वार होत जगण्यासाठीच्या सुरु असलेल्या या संघर्षाकडे म्हणूनच जगाचं लक्ष लागलंय (Know all about reasons behind big migration of morocco citizens in spain).

मोरोक्कोचे हजारो नागरिक स्थलांतर करत स्पेनमध्ये येत आहेत. त्यामुळे क्वेटोच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात हे नागरिक जमा झालेले दिसत आहेत. (Photo Credit : Reuters)

समुद्राच्या खाऱ्या पाण्यात ओघळणारे अश्रू, जगण्यासाठीचा संघर्ष, चिमुकल्यांना खांद्यावर घेत केलेला शेकडो मैलांचा प्रवास, मग तो जमिनीवर असेल किंवा समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन केलेला. मात्र दुसऱ्या देशाच्या भूमीवर आपल्याला स्वीकारलं न जाणं आणि आपल्याही भूमीवर परतणं कठीण अशाच गुंत्यात अडकलेले हे प्रवासी. दुसऱ्या भूमीवर प्रवेशापूर्वीच होणारा लाठीमार, चिमुकल्यांना वाचवण्यासाठी चाललेली आई-वडिलांची धडपड हे सारं काही सुन्न करणार. स्पेनच्या सीमेवर जमलेल्या हजारो स्थलांतरितांची हीच कैफियत.

अनेक कुटुंबं आपल्या घरातील लहान मुलांनाही सोबत घेऊन पाण्यातील प्रवास करत आहेत. अशावेळी एका लहान बाळाला वाचवतानाचा क्षण. (Photo Credit : Reuters)

स्थलांतराचं नेमकं कारण काय?

17 व्या शतकापासून क्वेटो आणि मेलिल्ला भाग स्पेनच्या नियंत्रणात आहेत. असं असलं तरी मागील अनेक वर्षांपासून या भागावर मोरोक्को देखील दावा करतोय. आता या शहरांनी आफ्रिकेसोबत सीमेबाबत करार केलाय. आता त्यांना स्पेनच्या काही भागांप्रमाणेच स्वायत्तता आहे. सध्याचा प्रश्न स्पेनच्या नियंत्रणात असलेल्या पश्चिम सहारा भागात तणाव तयार झाल्यानंतर तयार झाला. सहारावर 1975 पर्यंत स्पेनचं नियंत्रण होतं. नंतर हा भाग मोरोक्कोच्या नियंत्रणात आला. तेव्हापासूनच मोरोक्को आणि सहारातील साहरवी समुहाच्या लोकांमध्ये वाद आहे. साहरवी हा सहारातील आदिवासी समुह आहे. मोरोक्कोने सहारावर नियंत्रण मिळवल्यानंतर येथील आदिवासी साहरवी समुहाने या भागाच्या स्वातंत्र्यासाठी पोलिसारियो फ्रंटच्या (Sahrawi people led by the Polisario Front) नेतृत्वात लढा उभा केलाय. याचं नेतृत्व 73 वर्षीय ब्राहिम घाली (Brahim Ghali) हे नेते करत आहेत.

मोरोक्को-स्पेन सीमेवर मोठ्या प्रमाणात लोक जमा झाल्यानं स्पेनने आपल्या सैन्यासह काही रणगाडेही तैनात केले आहेत. (Photo Credit : Reuters)

साहरवी समाजाच्या नेत्याला उपचारासाठी दाखल करुन घेतल्यानं मोरोक्कोकडून इशारा

नागरिकांच्या स्थलांतरामुळे मोरोक्को-स्पेन सीमेला छावणीचं रुप आलंय. (Photo Credit : Reuters)

ब्राहिम घाली यांना एप्रिलमध्ये कोरोना संसर्ग झाला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी स्पेनने मदत केली आणि स्पेनमधील अद्ययावत रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु केले. तेव्हापासूनच मोरोक्को आणि स्पेनमध्ये तणाव तयार झालाय. साहरवी नेते घाली यांना रुग्णालयात दाखल केल्यानं मोरोक्कोने तीव्र नाराजी व्यक्त करत स्पेनला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला. त्यानंतरच मोरोक्कोच्या सीमेतून स्पेनच्या भागात मोठ्या प्रमाणात स्थलांतरीतांचे लोंढे येण्यास सुरुवात झाली. विशेष म्हणजे मोरोक्कोच्या सीमेवर स्थानिक सुरक्षा दल स्थलातंरितांना स्पेनमध्ये जाण्यापासून थांबवत देखील नाहीये. घाली यांनी स्पेनने रुग्णालयात दाखल करुन घेतल्यानंच मोरोक्कोकडून असं केल्याचा आरोप होत आहे.

जगाचं लक्ष वेधणारं स्थलांतर

मोरोक्कोचे नागरिक पाण्यातून पोहत स्पेनच्या सीमेपर्यंत येत आहेत. यात त्यांना अनेक हालअपेष्टाही सहन कराव्या लागत आहेत. (Photo Credit : Reuters)

जगभरात सध्या अनेक ठिकाणी मोठ्या घटना घडताना दिसताहेत, मात्र यातच एक मोठं स्थलांतर सध्या जगाचं लक्ष वेधून घेतंय. मोरोक्कोचे हजारो नागरिक स्थलांतर करत स्पेनमध्ये दाखल होताएत. त्यामुळे क्वेटोच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाल्याचं चित्र दिसत आहेत. मंगळवारी तब्बल 8000 लोक स्पेनच्या सीमेवर दाखल झालेत. स्पेनने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 1 जानेवारीपासून 15 मेपर्यंत 475 प्रवासी सेऊटामध्ये पोहोचलेत. आता ही संख्या हजारोंच्या घरात जाताना दिसतेय.

स्थलांतरितांचे हाल, तरीही लहान मुलांसह पाण्यातून प्रवास

सीमेवर पालकांसोबत आलेल्या मोरोक्कोतील लहान मुलांचे हाल होताना दिसत आहेत. (Photo Credit : Reuters)

मोरोक्कोचे नागरिक पाण्यातून पोहत स्पेनच्या सीमेपर्यंत येत आहेत. हे स्थलांतर करताना त्यांना अनेक हालअपेष्टाही सहन कराव्या लागत आहेत. अनेक कुटुंबं आपल्या घरातील लहान मुलांनाही सोबत घेऊन पाण्यातील प्रवास करत आहेत. मोरोक्कोच्या नागरिकांनी बेकायदेशीरपणे स्पेनमध्ये शिरकाव करु नये म्हणून सीमेवर स्पेनचे सैनिक तैनात आहेत. हे सैनिक स्थलांतरीतांचे हाल पाहून येणाऱ्या नागरिकांना मदतही करत आहेत. मोरोक्कोहून पोहून येताना तब्येत बिघडलेल्या लहान मुलांना स्पेनच्या सैनिकांकडून उपचारही केले जात आहेत.

स्पनेकडून सीमेवर कडेकोट बंदोबस्त

स्पेनच्या सैन्याने सीमेवर जमा झालेल्या मोरोक्कोच्या नागरिकांवर लाठीचार्ज करत त्यांना पळवून लावण्याचाही प्रयत्न केला. (Photo Credit : Reuters)

रेड क्रॉस संघटनेच्या स्वयंसेवकांकडून मोरोक्को-स्पेन सीमेवर स्थलांतरितांना मदतही केली जातेय. स्पेनमधील क्वेटोमध्ये मोरोक्कोचे नागरिक पोहून स्पेनमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे स्पेनने कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय. मोरोक्को-स्पेन सीमेवर मोठ्या प्रमाणात लोक जमा झाल्यानं स्पेनने आपल्या सैन्यासह काही रणगाडेही तैनात केलेत.

स्पेनच्या सैन्याने सीमेवर जमलेल्या मोरोक्कोच्या नागरिकांवर लाठीचार्ज करत त्यांना पळवून लावण्याचाही प्रयत्न केला. नागरिकांच्या स्थलांतरामुळे मोरोक्को-स्पेन सीमेला छावणीचं रुप आलंय. मोरोक्कोचे अनेक नागरिक पोहून येत सीमेवरील कुंपणाच्या अवतीभोवती गोळा होत आहेत.

हेही वाचा :

PHOTOS : जगाचं लक्ष वेधून घेणारं मोठं स्थलांतर, मोरोक्को-स्पेन सीमेवरील परिस्थिती चिंताजनक

चिनी चॅनलकडून यहुदींवर ‘हे’ गंभीर आरोप, इस्राईलच्या राजदुताकडून आक्षेप, नव्या वादाचं कारण काय?

PHOTOS : इस्राईलच्या हल्ल्यात गाझा बेचिराख, हादरवून टाकणारे फोटो

व्हिडीओ पाहा :

Know all about reasons behind big migration of morocco citizens in spain

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.