Mumbai 26/11 Attack हल्ल्यातील आणखी एका मोठ्या दहशतवाद्याचा पाकिस्तानात मृत्यू, स्पेशल ऑपरेशन का?
Mumbai 26/11 Attack | लष्कर-ए-तोयबाचे जे दहशतवादी मारले गेले, त्यामागे भारतीय गुप्तचर यंत्रणा असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. आझम चीमा हा पंजाबी बोलणारा, दाढी असलेला, उंच धिप्पाड शरीरयष्टीचा दहशतवादी होता.
लाहोर : लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा इंटेलिजन्स प्रमुख आझम चीमाचा पाकिस्तानात मृत्यू झाला आहे. 70 वर्षाच्या चीमाने फैसलाबाद येथे अखेरचा श्वास घेतला. आझम चीमाचा मृत्यू हार्ट अटॅकेने झाल्याच बोलल जातय. पण पाकिस्तानच्या जिहादी वर्तुळात संशयाच वातावरण आहे. आझम चीमाचा मृत्यू हाट अटॅकनेच झाल्याबद्दल अजूनही अनेकांना खात्री नाहीय. काही जिहादींच्या मनात भिती, संशय आहे. कारण मागच्या काही महिन्यात पाकिस्तानात अनेक दहशतवादी रहस्यमयी पद्धतीने मारले गेले आहेत. खासकरुन भारतविरोधी दहशतवाद्यांना वेचून-वेचून संपवण्यात येतय. लष्कर-ए-तोयबाचे जे दहशतवादी मारले गेल, त्यामागे भारतीय गुप्तचर यंत्रणा असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. पण भारताने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
मुंबईवर 2008 साली 26/11 भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. आजही या हल्ल्याच्या आठवणी मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत. पाकिस्तानातून समुद्रमार्गे मुंबईत घुसलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईच्या रस्त्यावर रक्ताचा सडा पाडला होता. अनेक निरपराध, निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले होते. आझम चीमा हा मुंबईवरील हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक होता. भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफीज सईद या हल्ल्याचा मुख्य मास्टरमाइंड होता. आता इतक्यावर्षांनी या हल्ल्यामागच्या अनेक सूत्रधारांना वेचून, वेचून मारल जातय. यामागे कोण आहे? या बद्दल अजूनही कोडच आहे.
अशा बातम्यांमुळे एकाच गोष्टीवर शिक्कामोर्तब होतं
या अशा दहशतवाद्यांच्या मृत्यूच्या बातमीमुळे भारताविरोधात कारस्थान रचणारे दहशतवादी अजूनही पाकिस्तानात आहेत, यावर शिक्कामोर्तब होतं. कारण हे दहशतवादी पाकिस्तानात असल्याच पाकिस्तानने वारंवार फेटाळून लावलय. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, आझम चीमा हा पंजाबी बोलणारा, दाढी असलेला, उंच धिप्पाड शरीरयष्टीचा दहशतवादी होता. 2000 साली तो पाकिस्तान बहावलपूरमध्ये होता. तिथे तो पत्नी आणि दोन मुलांसह रहायचा.