White House : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या घराजवळ भीषण विमान अपघात, आतापर्यंत नदीतून 18 मृतदेह काढले बाहेर
White House : व्हाइट हाऊस हे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच निवासस्थान आहे. अमेरिकेतील कंसास सिटी येथून हे विमान वॉशिंग्टनला चाललं होतं. विमानाच्या एअरपोर्टवरील लँडिंगआधी ही घटना घडली. मिलिट्री हॅलिकॉप्टर आणि विमानाची टक्कर या बद्दल लोक अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत.

अमेरिकेत व्हाइट हाऊसजवळ मोठा विमान अपघात झाला आहे. व्हाइट हाऊस हे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच निवासस्थान आहे. दुर्घटनेनंतर विमान पोटोमॅक नदीत कोसळलं. नदीतून आतापर्यंत 18 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या विमानात 60 प्रवासी होते. हेलिकॉप्टरला विमान धडकल्याने हा भीषण अपघात झाला आहे. हे विमान वॉशिंग्टनच्या रोनाल्ड रिगन इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरणार होतं. अमेरिकेतील कंसास सिटी येथून हे विमान वॉशिंग्टनला चाललं होतं. कॅनडा एअरच हे विमान होतं. सध्या रोनाल्ड रिगन इंटरनॅशनल एअरपोर्टवर सगळी उड्डाण आणि लँडिंग थांबवण्यात आली आहेत. विमान आणि हॅलिकॉप्टरचा ढिगारा पोटोमॅक नदीमध्ये आहे. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.
हे विमान हेलिकॉप्टरला धडकल्याने हा भीषण अपघात झाला. हे अमेरिकन सैन्याच H-60 ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर होतं. या दुर्घटनेनंतर रीगन इंटरनॅशनल एअरपोर्टवर इमर्जन्सी घोषित करुन विमानतळ बंद करण्यात आला. व्हाइट हाऊस ते एअरपोर्ट हवाई अंतर तीन किलोमीटरपेक्षा पण कमी आहे. हा अपघात झाला, त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाऊसमध्ये उपस्थित होते. हा अपघात आहे की कारस्थान ते अजून समजू शकलेलं नाही. मिलिट्री हेलिकॉप्टर अचानक विमानाच्या समोर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोटोमॅक नदी बर्फासारखी घट्ट झाली आहे. त्यामुळे लोकांच्या बचावण्याची शक्यता फार कमी आहे.
‼️Mass casualty event: Washington DC
Searches underway as an American Airlines plane has crashed into a helicopter while landing at Reagan Airport Washington D.C.
— JB 🇺🇸 (@BarkosBite) January 30, 2025
अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत
विमानाच्या एअरपोर्टवरील लँडिंगआधी ही घटना घडली. मिलिट्री हॅलिकॉप्टर आणि विमानाची टक्कर या बद्दल लोक अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. अचानक मिलिट्री हेलिकॉप्टर तिथे कसं आलं?. मिलिट्री हेलिकॉप्टरमध्ये कोण होतं? संघीय उड्डयन प्रशासनाने (FAA) आणि राष्ट्रीय परिवहन सुरक्षा बोर्ड (NTSB) रोनाल्ड रीगन राष्ट्रीय विमानतळाजवळ झालेल्या या अपघाताची चौकशी करणार आहे