तुर्कीत शक्तिशाली भूकंप, इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
तुर्की देशाच्या इजमिर शहरात अनेक भागांमध्ये इमारती कोसळल्या आहेत. शेकडो लोकांचे घरे उद्ध्वस्त झाले आहेत (Major Earthquake in turkey and Greece).
अंकारा : जगभरात कोरोनाचं संकट सुरु असताना तुर्की आणि ग्रीस हे दोन देश आज (30 ऑक्टोबर) भूकंपाने हादरले आहेत. या दोन्ही देशांच्या सीमाभागात भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षणानुसार या भूकंपाची तीव्रता तब्बल 7.0 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपात अनेक इमारती पत्त्यासारख्या जमिनीवर कोसळल्या आहेत (Major Earthquake in turkey and Greece).
भूकंपाने तुर्की देशात प्रचंड नुकसान झालं आहे. तुर्की देशाच्या इजमिर शहरात अनेक भागांमध्ये इमारती कोसळल्या आहेत. शेकडो लोकांचे घरे उद्ध्वस्त झाले आहेत. जनजीवन विस्कळीत झालं आहे (Major Earthquake in turkey and Greece).
तुर्कीचे आरोग्यमंत्री फहार्टिन कोका यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 200 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. इजमिरचे गव्हर्नर यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 70 नागरिकांचा प्राण वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. मात्र, अद्यापही शेकडो लोक इमारतींच्या मलब्याखाली अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.
इमारत कोसळण्याचे दृश्य कँमेरात कैद झाले आहेत. या भूकंपामुळे बोर्नोवा आणि बेराकली शह या भागातही इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, अशी माहिती तुर्कीचे मंत्री सुलेमान सोयलू यांनी दिली आहे. भूकंपानंतर मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरु करण्यात आले आहे. या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Building collapses after massive earthquake hits western #Turkey#izmir pic.twitter.com/KztimGTvln
— Press TV (@PressTV) October 30, 2020
Wow a mini tsunami occurred in Izmir’s Seferhisar after a 6.6 magnitude earthquake pic.twitter.com/uRNz0PrXeZ
— Ragıp Soylu (@ragipsoylu) October 30, 2020