AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉक्टर म्हणाले “अभिनंदन! सात बाळं होणारेत”, महिलेने जन्म दिला…

माली देशात 25 वर्षीय हलिमा सिझ (Halima Cisse) हिने एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिला (Mali Woman 9 Babies Delivery)

डॉक्टर म्हणाले अभिनंदन! सात बाळं होणारेत, महिलेने जन्म दिला...
माली देशात महिलेचा नऊ बाळांना जन्म
| Updated on: May 05, 2021 | 3:56 PM
Share

बामाको : माली (Mali) या पश्चिम आफ्रिकन देशातील गर्भवतीने चक्क एकाच वेळी नऊ बाळांना (Nonuplets) जन्म दिला. महिलेच्या गर्भात सात अर्भक असल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला होता. मात्र प्रसुतीवेळी तिच्या गर्भातून नऊ बाळांनी जन्म घेतला. बाळंतीण आणि नऊही बाळं सुखरुप असल्याची माहिती माली सरकारने दिली आहे. (Mali Pregnant Woman gave birth to nonuplets 9 Babies Delivery in Morocco)

मालीची महिला, मोरोक्कोत प्रसुती

25 वर्षीय हलिमा सिझ (Halima Cisse) हिने एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिला. पश्चिम आफ्रिकेतील मालीसारख्या गरीब देशातील ही महिला आहे. तिची अधिकाधिक काळजी घेऊन प्रसुती करण्यासाठी तिला 30 मार्च रोजी मोरोक्को (Morocco) या उत्तर आफ्रिकन देशात स्थलांतरित करण्यात आले होते.

सात बाळं असल्याचा अंदाज

सुरुवातीला महिलेच्या गर्भात सात बाळं (septuplets) असल्याचा डॉक्टरांचा कयास होता. मोरोक्को सरकारने मात्र या अतिदुर्मीळ प्रसुतीबाबत जाहीर भाष्य केलेलं नाही. मोरोक्को आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी आपल्या देशातील रुग्णालयात अशी प्रसुती झाल्याची माहिती नसल्याचं सांगितलं. परंतु माली सरकारने हलिमाने पाच मुलगे आणि चार मुलींना जन्म दिल्याची घोषणा केली. सिझेरियन करुन तिची प्रसुती करण्यात आली.

माली सरकारकडून दुजोरा

बाळंतीण आणि नऊही बाळं सुखरुप आहेत. काही आठवड्यात ते माली देशात परततील, अशी माहिती मालीच्या आरोग्य मंत्री फँटा सिबी यांनी एएफपी वृत्तसंस्थेला दिली. दोन्ही देशांच्या आरोग्य यंत्रणांचं त्यांनी अभिनंदनही केलं. मात्र हलिमाची प्रकृती आणि नऊ बाळांनी तग धरण्याबद्दल स्थानिक वर्तमानपत्रांनी साशंकता व्यक्त केली आहे. (Mali Pregnant Woman gave birth to nonuplets 9 Babies Delivery in Morocco)

संबंधित बातम्या :

मिरारोडमध्ये नायजेरियन महिलेची रस्त्यावर प्रसुती, ऑटोरिक्षात संसार

गर्भवतीला रस्त्यातच प्रसुतीकळा, वरळीत पोलिसांच्या गाडीतच महिलेची प्रसुती

(Mali Pregnant Woman gave birth to nonuplets 9 Babies Delivery in Morocco)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.