Russia-Ukraine War : कोणता बॉम्ब कधी जीवन संपवेल अशी मारियुपोल शहरात परिस्थिती, 5 हजार लोकांचा हल्ल्यात मृत्यू
युक्रेन (Russia) आणि रशियामधील (Ukraine) युद्धाचा (War) आज ३४ वा दिवस आहे. रशियाकडून सुरू असलेल्या बॉम्ब हल्ल्याने युक्रेनचे नागरिक आता हैराण झाले आहेत. अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत.
युक्रेन (Russia) आणि रशियामधील (Ukraine) युद्धाचा (War) आज ३४ वा दिवस आहे. रशियाकडून सुरू असलेल्या बॉम्ब हल्ल्याने युक्रेनचे नागरिक आता हैराण झाले आहेत. अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. विशेष म्हणजे मारियुपोलमध्ये सर्वात मोठी शोकांतिका घडल्याचं पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनूसार मारियुपोलमध्ये या शहरात रशियन हल्ल्यात 5 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. वेदनेची कहाणी इतकी खोल आहे, की हजारो लोक बेघर झाले आहेत. युक्रेनची रुग्णालये जखमी झालेल्या लोकांनी भरलेली आहेत. कोणता बॉम्ब क्षणार्धात कधी जीवन संपवेल अशी परिस्थिती आहे, या भीतीन लोक प्रचंड घाबरली आहेत. मारियुपोल शहरात सध्या परिस्थिती अशी आहे की, उद्यान आणि शाळांमध्ये मृतांचे पुरले केले जात आहे. रशियाने इथे एवढा विध्वंस केला आहे की 90 टक्के इमारतींना मोठे तडे गेले आहेत, तसेच अनेक इमारती . तर 40 टक्के इमारती अशा आहेत की त्या पूर्णपणे आहेत.
रशियन सैनिक रस्त्यावर उतरले आणि लोकांच्यावरती हल्ला केला
रशियाकडून युक्रेनवरती केलेलं आक्रमण थांबण्याची घोषणा केली. त्यावेळी मारियुपोल शहरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येईल, तसेच अडकलेल्या लोकांच्यासाठी मानवी कॉरिडॉर बांधण्यात येईल. विशेष म्हणजे सुरक्षित रस्ता उपलब्ध करून दिला जाईल जेणेकरुन लोकांना येथून सहज बाहेर पडता येईल. पण घडले नेमके उलटे ज्यावेळी युक्रेनची जनता बाहेर पडली त्यावेळी रशियाकडून त्यांच्या गोळीबार करण्यात आला. रशियाच्या सैनिकांनी घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या युक्रेन नागरिकांच्या अंगावरती हवाई हल्ले केले. हल्ल्यात हजारो लोकांचा मृत्यू झाला. तसेच हवाई हल्लात काही इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. तर काही इमारतींना तडे गेले आहेत. अजूनही इमारतींमधून धूर येत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
उद्यान आणि शाळांमध्ये मृतदेह पुरले
युक्रेनने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पार्थिवांना स्मशान भूमीत नेणं शक्य नाही. रशियाच्या सैन्याने युक्रेनच्या नागरिकांवरती अचानक भ्याड हल्ला केल्याने नागरिक भीतीखाली आयुष्य जगत आहेत. रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात अनेक इमारती कोसळल्या असून नागरिकांना बाहेर पडण्यास रस्ता नाही. मारियुपोलमधील अनेक सेवा बंद करण्यात आल्याने लोकांना संपर्क साधण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शहरातलं इंटरनेट पुर्णपणे बंद करण्यात आलं आहे. शहरातील लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.