मंगळालवरील खडक व मातीचे नमुने पृथ्वीवर आणणार; मंगळ ग्रहावर उतणार दोन हेलिकॉप्टर
मंगळाच्या पृष्ठभूमिवरील खडक व मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी आता नासाने विशेष मोहिम राबवली आहे. या मोहिमे अंतर्गत मंगळावर आणखी दोन मिनी हेलिकॉप्टर्स पाठविण्याची योजना नासाने आखली आहे. या योजनेची नासाने घोषणा केली आहे. ‘पर्सिव्हरन्स’ आता ‘डबल ड्यूटी’ करून तेथील दगड-मातीचे नमुने रॉकेटमध्ये ठेवणार आहे. जे आणखी दशकभराने पृथ्वीच्या दिशेने झेपावणार आहे. मंगळाच्या पृष्ठभूमिवर ‘नासा’चे पर्सिव्हरन्स हे रोव्हर आणि ‘इंज्युनिटी’ हे हेलिकॉप्टर (रोटरक्राफ्ट) सध्या संशोधन करत आहेत.
वॉशिंग्टन : मंगळ(Mars) ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी वैज्ञानिक अथक परिश्रम घेत आहेत. विशेषत: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था असलेल्या ‘नासा’ (NASA)अनेक मोहिमा राबवत आहे. जीवनसृष्टीचा शोध घेण्यासाठी नासा मंगळाच्या पृष्ठभूमिवरील खडक व मातीचे नमुने(rock and soil samples) पृथ्वीवर(Earth) आणणार आहे. मंगळ ग्रहावर उतणार दोन हेलिकॉप्टर अर्थात रोटरक्राफ्ट उतरणार आहेत. ‘नासा’चे पर्सिव्हरन्स हे रोव्हर आणि ‘इंज्युनिटी’ हे हेलिकॉप्टर हे काम करणार आहेत.
मंगळाच्या पृष्ठभूमिवरील खडक व मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी आता नासाने विशेष मोहिम राबवली आहे. या मोहिमे अंतर्गत मंगळावर आणखी दोन मिनी हेलिकॉप्टर्स पाठविण्याची योजना नासाने आखली आहे. या योजनेची नासाने घोषणा केली आहे. ‘पर्सिव्हरन्स’ आता ‘डबल ड्यूटी’ करून तेथील दगड-मातीचे नमुने रॉकेटमध्ये ठेवणार आहे. जे आणखी दशकभराने पृथ्वीच्या दिशेने झेपावणार आहे. मंगळाच्या पृष्ठभूमिवर ‘नासा’चे पर्सिव्हरन्स हे रोव्हर आणि ‘इंज्युनिटी’ हे हेलिकॉप्टर (रोटरक्राफ्ट) सध्या संशोधन करत आहेत.
मंगळावरील दगडांमध्ये ड्रील करून अकरा नमुने गोळा केलेत
‘पर्सिव्हरन्स’ या रोटरक्राफ्टने यापूर्वीच मंगळावरील दगडांमध्ये ड्रील करून तब्बल अकरा नमुने गोळा केलेले आहेत. आता आणखी ड्रिलिंग केले जाणार आहे. ‘पर्सिव्हरन्स’ने एका अशा दगडामध्ये ड्रील करून नमुने घेतले आहेत ज्यामध्ये प्राचीन काळातील मंगळावरील जीवसृष्टीचे पुरावे दडलेले असू शकतात असा दावा अॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या मुख्य संशोधिका मीनाक्षी वाधवा यांनी केला आहे. मंगळावरुन गोळा केलेले हे सर्व नमुने पृथ्वीवर कधी येतील याचीच प्रतीक्षा आहे. ‘इंज्युनिटी’ हेलिकॉप्टरने आतापर्यंत मंगळावर 29 उड्डाणे केलेली आहेत. गेल्या वर्षीच्या प्रारंभीच हे मिनी हेलिकॉप्टर पर्सिव्हरन्ससोबत मंगळाव र उरतले आहे.
पर्सिव्हरन्सची शानदार कामगिरी
पर्सिव्हरन्सच्या शानदार कामगिरीमुळेच आता अशी आणखी दोन मिनी हेलिकॉप्टर्स मंगळावर पाठविण्याची नासाची योजना आहे. प्रत्येक हेलिकॉप्टर एका वेळी प्रत्येकी एक सॅम्पल ट्यूब उचलून रॉकेटमध्ये ठेवण्यासाठी खास डिझाईन केले जाणार आहे. अशा पद्धतीने सर्व ट्यूब रॉकेटमध्ये ठेवल्या जातील व हे रॉकेट सर्व सॅम्पल घेऊन पृथ्वीवर लँड होणार आहे. ही मोहिम कोणत्याही अडथळ्या विना सुरीत सुरु राहिली तर 30 नमुने घेऊन रॉकेट 2031 मध्ये मंगळावरून उड्डाण करेल आणि ते 2033 मध्ये पृथ्वीवर पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.