Video : कुणी कल्पानाही केली नसेल असा भीषण रेल्वे अपघात! ट्रेन पेटली ट्रेनसोबतच शेजारची घरंही
आगीच्या ज्वाळांसह धावणारी भरधाव रेल्वे कॅमेऱ्यात कैद! मॅक्सिकोत नेमका कसा घडला रेल्वेचा थरारक अपघात?
मॅक्सिको : कुणी कल्पानाही केली नसेल, असा भीषण रेल्वे अपघात मॅक्सिकोत (Mexico Railway Accident Video) घडलाय. या घटनेची थरकाप उडवणारी दृश्य समोर आली आहेत. इंधन वाहून नेणाऱ्या एका कंटेरनला भरधाव मालवाहू ट्रेनने (Mexico Good Train Fire Video) जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यावेळी आग भडकली. त्यानंतर आग लागलेल्या तशाच अवस्थेत भरधाव मालवाहू ट्रेन धावत होती. रेल्वे फाटकासाठी (Mexico News) थांबलेल्या काही वाहनांमधील लोकांनी हा थरारक अपघात आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय.
Cargo train drives through flames after crashing into fuel truck in Central Mexico catching houses on fire. pic.twitter.com/U8iW9nsNpK
हे सुद्धा वाचा— Inflight hypersonic missile technician (@SILEN_PHOTO) October 21, 2022
सेंट्रल मॅक्सिकोमध्ये घडलेल्या या अपघातानंतर काही घरांनाही आगीने आपल्या कवेत घेतलं. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र प्रचंड मोठं आर्थिक नुकसान झालं. विशेष म्हणजे मालवाहू गाडीच्या या दिशेने जात होती, त्या मार्गात असलेल्या घरांनाही आगीचा फटका बसला. अनेक घरं जळून आगीत जळून खाक झालीत.
पाहा थरारक व्हिडीओ :
BREAKING: Several structures on fire in central Mexico’s Aguascalientes after collision between cargo train and fuel truck causes #explosion, fire; at least 2,000 people evacuated.#Fire #Accident #Mexico pic.twitter.com/iY8YwmbkWj
— Chaudhary Parvez (@ChaudharyParvez) October 21, 2022
समोर आलेल्या व्हिडीओ आग लागलेल्या रेल्वे गाडीच्या डब्बे भरधाव वेगाने जात असल्याचं दिसलंय. यामुळे एकच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं होतं. नेमकं या दुर्घटनेत किती नुकसान झालं, याची माहिती मिळाली नसली तरी प्रचंड आर्थिक फटका या दुर्घटनेत बसल्याची भीती व्यक्त केली जातेय.
#Mexique ?? – ??Plusieurs structures en feu à Aguascalientes, dans le centre du pays, après une collision entre un train de marchandises et un camion-citerne. Ce qui a entraîné une explosion suivi d’un incendie. Plusieurs milliers personnes ont été évacuées. #Mexico #fire pic.twitter.com/YvZ09WCRqJ
— ⓃⒺⓌⓈ—ⒾⓃⓉ·۰•●? (@NewsInt_) October 21, 2022
12 लोकांना या आगीतून वाचवण्यात यश आलं असल्याचं स्थानिक वृत्त संस्थांनी म्हटलंय. कुणीही या आगीत जखमी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र या आगीचे लोट दूरवर पसरले होते. स्थानिक बचाव यंत्रणांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यास सुरुवात केली.
इंधन वाहून नेणाऱ्या कंटेरन ट्रकच्या चालकाला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी केली. मॅक्सिको पोलिसांकडून या अपघाताचा अधिक तपास आता केला जातोय. दरम्यान, शेकडो लोकांना वेळीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय.