PM Modi Brunei Visit : ब्रुनेईच्या सुल्तानाकडे सोन्याचे बेसिन, विमान आणि राजवाडा
निव्वळ तेलाने समृद्धी आलेल्या सुल्तानाची संपत्ती डोळे दीपिविणारी आहे. या छोट्या परंतू तेलसंपन्न देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रुनेई देशाच्या दौऱ्यावर जात आहे. त्यामुळे हा देश चर्तेत आला आहे. राजेशाही थाटामुळे या देशाच्या सुल्ताना नेहमीच चर्चेत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी साऊथ एशियातील देश ब्रुनेइ आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे छोटासा हा देश आणि तेथील राजेशाही पुन्हा चर्तेत आली आहे. या देशाचा सुल्तान जगात सर्वात श्रीमंत आहे. त्यांच्या लग्झरी आयुष्य कायम चर्तेत असते. या सुल्तानाचा राजवाडा खूपच चर्तेत असून त्यांच्याकडे हजारो लक्झरीयस कारचे कलेक्शन आहेत. हे सुल्तान आपल्या पद्धतीने अत्यंत ऐषोआरामात जीवन जगत आहेत.
कोण आहेत हे सुल्तान
ब्रुनेई देशाच्या सुल्तानाचे नाव हसनल बोल्किया आहे. त्यांचा समावेश जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होतो. ब्रुनेईला साल 1984 मध्ये ब्रिटीशांपासून स्वातंत्र्य मिळाले. सुल्तान उमर अली सैफुद्दीन III 5 ऑक्टोबर 1967 रोजी ब्रुनेईचे राजा म्हणून जाहीर झाले. आता ते सलग 59 वर्षापासून ब्रुनेईच्या गादीचे सुल्तान आहेत.
कशी आहे त्यांची जीवन शैली ?
आपल्या ऐषोआराम आणि चैनीच्या जीवनशैलीमुळे ते जगात प्रचंड प्रसिद्ध आहेत.त्यांचा राजवाडा अनेक एकरवर पसरले आहे.त्यातील अनेक वस्तू सोन्याचा मुलामा दिलेल्या आहेत.त्यांच्याकडे एक चार्टर्ड फ्लाईट देखील आहे. या खाजगी विमानातील अनेक वस्तू सोन्याचा मुलामा दिलेल्या आहेत.जगातील सगळ्यात जादा चैनीचे आयुष्य ते जगत आहे.त्यांच्याकडे लक्झरी गाड्यांचे कलेक्शन आहे.सुल्तानच्या महलाची कहाणी अनोखी आहे.त्यांच्या संपत्तीबाबत अनेक वंदता आहेत. तरीपण त्यांच्याकडे 30 बिलियन डॉलरची त्यांच्या संपत्ती आहे.
सुल्तान हसनल यांनी साल 1980 मध्ये एक जगातील सर्वात मोठा राजवाजा बांधला आहे.या महालात 1,770 खोल्या आणि सुस्च आहेत. तसेत जगातील सर्वात मोठे लक्झरी कारचे गॅरेज देखील त्यांच्याकडे आहे. दोन दशलक्ष चौरस फूटाचे लक्झरीयस कार गॅरेज देखील आहे. या महालाच्या घुमटालाच 22 कॅरेटचे सोने बसविले आहे.या महलाची किंमत 2550 कोटी रुपये आहे.
सुल्तान हसनल यांना सोन्याचे इतकं वेड आहे की त्यांनी घरात सोन्याचे बेसिन लावले आहे. कार आणि विमानाला देखील सोन्याचा मुलामा दिला आहे. त्यांनी एकदा त्यांच्या कन्येला Airbus A340 हे विमानच बर्थडे गिफ्ट म्हणून दिले होते.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या बातमीनूसार त्यांच्या राजवाड्यात 1700 खोल्या आहेत. तसेच 257 वॉशरुम आहेत.आणि कारसाठी 110 गॅरेज आहेत. राजवाज्याच्या काही भित्तींना देखील सोन्याचा मुलामा लावला आहे. सुल्तान केस कापायला विमानाने लंडनला जातात. त्याचा खर्च 20 हजार डॉलर आहे. कारण विमानाने ते केस कापायला लंडनला जातात.
मुस्लीम देश
ब्रुनेई या देशाची लोकसंख्या 80 टक्के मुस्लीम आहे. ब्रुनेईला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विरोध पक्षासाठी स्थानच नाही. येथे कोणतीही सिव्हील सोसायटी अस्तित्वात नाही. येथे 1962 पासून घोषीत केलेली आपात्कालिन सरकारचे कामकाज सुरु आहे.